अभिनेता दिलीप कुमार यांना रुग्णालयात केलं दाखल

अभिनेता दिलीप कुमार यांना बुधवारी दुपारी डिहाइड्रेशनमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. त्यांनी कुटुंबासोबत जेवण सुद्धा केलं. आज त्यांना काही काळ आयसीयुमध्ये देखील ठेवणार आहेत.

Updated: Aug 3, 2017, 10:38 AM IST
अभिनेता दिलीप कुमार यांना रुग्णालयात केलं दाखल

मुंबई : अभिनेता दिलीप कुमार यांना बुधवारी दुपारी डिहाइड्रेशनमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. त्यांनी कुटुंबासोबत जेवण सुद्धा केलं. आज त्यांना काही काळ आयसीयुमध्ये देखील ठेवणार आहेत.

दिलीप कुमार यांना बुधवारी दुपारी १२ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना तिथे आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं. त्यांनंतर काही टेस्ट केले गेले. त्यावेळेस त्यांची पत्नी सायरा बानो देखील त्याच्या सोबत होती. दिलीप कुमार यांची भाची शायशा हिने ट्विट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली.