मुंबई : अभिनेता हार्दिक जोशी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर अभिनेता हार्दिक जोशीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर हार्दिक नेहमीच सक्रिय असतो. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हार्दिक सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. नुकताच झी मराठी वाहिनीवरील जाऊ बाई गावात कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात हार्दिक सुत्रसंचालनाची भूमिका पार पाडत होता. हा शो अवघ्या दिवसांतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागला होता.
मात्र 'काका मला वाचवा' असं अभिनेता का म्हणत आहे. असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. तर अनेकांनी चिंताही व्यक्त केली आहे की, हार्दिक असं नेमकं का म्हणत आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेता हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात एकत्र आले आहेत. या चित्रपटात ते काका पुतण्याच्या भूमिकेत दिसणार असून, हार्दिक जोशी 'काका मला वाचवा' म्हणत आहे. तो असं का म्हणत आहे याचं उत्तर ८ मार्चला मिळणार आहे.
अमोल कागणे प्रस्तुत "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं स्पष्ट होतं. त्याशिवाय लग्नाशी संबंधित विषय असल्यानं काहीतरी मजेदार पहायला मिळणार यात शंका नाही.
हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. काका-पुतण्याच्या भूमिकेत असलेल्या या दोघांनी या चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. काका पुतण्यासाठी काय करतो? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हार्दिक जोशी 'काका मला वाचवा' अशी साद सुनील अभ्यंकर यांना का घालत आहे, याचं उत्तर मिळण्यासाठी थोडेच दिवस थांबावं लागणार आहे. तर नुकताच हार्दिकच्या जाऊ बाई गावात या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.