कसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार

Kichcha Sudeep नं हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Updated: Nov 25, 2022, 12:52 PM IST
कसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep ) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. किच्चा हा त्याच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता किच्चा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. किच्चानं 31 गायी दत्तक घेणार आहे. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी किच्चा दत्तक घेणार आहे.

हेही वाचा : सावधन.. Amitabh Bachchan यांचा आवाज आणि फोटो वापरताय? हायकोर्टाचे आदेश वाचाच

किच्चानं गुरूवारी कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभु बी चौहान यांच्या निवासस्थानी गौ पूजा केली. यावेळी गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं सुरु केलेल्या या कामाची त्याने प्रशंसा केली. राज्य सरकारनं माझी पुण्यकोटी दत्तू योजनेच्या अ‍ॅम्बिसीडरपदी नियुक्ती केली, यामुळे माझ्या जबाबदारीत वाढ झाली आहे, असं तो म्हणाला. (Actor Kichcha Sudeep to adopt 31 cows under Punyakoti Dattu Yojana in karnataka ) 

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या वाढदिवशी 11 गायी दत्तक घेतल्या.

दरम्यान, यंदाच्या वर्षी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या वाढदिवशी 11 गायी दत्तक घेतल्या. मंत्री प्रभु चव्हाण यांनीही 31 गायी दत्तक घेतल्याची घोषणा केली. हे पाहून मी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातील एक गाय दत्तक घेणार असल्याचं किच्चाने जाहिर केलं. कर्नाटक हे पहिलं राज्य आहे ज्यानं पुण्यकोटी दत्तू योजना राबवली. कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर तब्बल 100 गोशाळा स्थापन झाल्या आहेत. याअंतर्गत पशु कल्याण मंडळ, पशु हेल्पलाईन केंद्र, पशु संजीवनी रूग्णवाहिका, गोमाता सहकारी संस्था, आत्मनिर्भर गोशाळा असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गाईच्या देखभालीसाठी दरवर्षी 11 हजार रूपये देण्यात येईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोक त्यांच्या इच्छेनुसार पायाभूत सुविधा आणि इतर खर्चासाठी पुण्यकोटी दत्तू पोर्टलमधील कोणत्याही गोशाळांना किमान 10 रुपये दान करू शकतात. सर्वसामान्यांच्या सहकार्याने गोशाळा आर्थिकदृष्ट्या सुदृढ करणं आणि सुरळीतपणे चालवणं हा या योजनेचा उद्देश आहे. गाय दत्तक, गोशाळेला देणगी आणि गोपालन योजनेत लोकसहभागाची सुविधा पशुखाद्य योजनेंतर्गत दिली जाते.