'आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कुणीतरी...' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिके आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Apr 18, 2023, 08:45 PM IST
'आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कुणीतरी...' अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर सक्रिय असतो.  आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद तो देत असतो. कुशल बद्रिके आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. 

मनातील भावना नेहमीच कुशल त्याच्या लिखाणातून मांडत असतो. एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो एक शायरी म्हणताना दिसत आहे. याचबरोबर शेअर केलेल्या या व्हिडिओला अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असं कुणीतरी असतंच नाहिका ? ज्याला आपण काहीही न सांगता, आपल्या मनातलं सगळं कळतं, आपल्या वेदनेशी एकरूप होणारी, अशी एकतरी व्यक्ती लागतेच आपल्याला जगण्यासाठी. सुकून''

सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहीलं आहे की, 'पाच ते सहा वेळा परत परत व्हिडिओ पहिलापहावाच वाटतोय अजून पण', तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, 'कवी कमाल बद्रीके' तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, 'टीव्ही वर जेवढा हसवतोस त्याच्या उलट रेग्युलर जीवनात शांत आहेस हा, जत्रा मधील टी सुरुवात आणि आज हा प्रवास'. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, 'अगदी बरोबर तुम्ही नकारात्मक भूमिकेत तुम्ही सिनेमा गाजवणार यात शंका नाही महाराष्ट्राला.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर कुशलच्या या पोस्टवर अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील कमेंट केली आहे. अभिनेत्रीने कमेंट करत म्हटलंय की, 'कुशल माझ्यासाठी पोस्ट करायची काहीच गरज नव्हती.' या कमेंट करत म्हटलं की, 'तुझ्याबाबतीत खरं सांगू, तु मनातलं ओळखंत नाहीस अजून पण, जे काही मनात असतं ते तुझ्याकडे बोललो की एकदम मोकळं वाटतं.' सध्या सोशल मीडियावर कुशलची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत. काहीजण कुशलच्या पोस्टवर कमेंट करत चिंता व्यक्त करत आहेत तर काहीजण मात्र अभिनेत्याच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.