आई तीन महिन्यांपूर्वी गेली अन्...; 'मातृदिनी' नानांची भावनिक पोस्ट

'आता कोणी दम देत नाही...'

Updated: May 12, 2019, 04:53 PM IST
आई तीन महिन्यांपूर्वी गेली अन्...; 'मातृदिनी' नानांची भावनिक पोस्ट title=

मुंबई : आज १२ मे रोजी Mother's Day 2019 साजरा केला जात आहे. स्वत:चा कोणताही विचार न करता, आपल्या मुलांवर नि:स्वार्थी प्रेम करणाऱ्या, आयुष्यभर आपल्या मुलांच्या सुखासाठी झटणाऱ्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपली मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी मात्र ती लहानच असतात. आजच्या मातृदिनी मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

'आई तीन महिन्यांपूर्वी गेली आणि मी अचानक मुलाचा, म्हातारा झालो. आता कोणी दम देत नाही...' असं म्हणत नाना पाटेकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

२९ जानेवारी रोजी नाना पाटेकर यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या. नाना पाटेकर आणि त्यांच्या आई निर्मला पाटेकर यांच्या नात्याविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. माध्यमांशी बोलताना अनेकदा नानांनी त्यांच्या आईचा आवर्जुन उल्लेख केलेला आहे. त्यांच्या आयुष्याच्या संपूर्ण जडणघडणीत त्यांच्या आईचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय. आजच्या मातृदिनीही नानांनी आईविषयी भावनिक पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.