close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रामलीलेची तुलना 'चाईल्ड पॉर्न'शी केल्याने प्रकाश राज अडचणीत

चौफेर टीकेची झोड 

Updated: Oct 22, 2019, 07:56 PM IST
रामलीलेची तुलना 'चाईल्ड पॉर्न'शी केल्याने प्रकाश राज अडचणीत

मुंबई : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले प्रकाश राज हे कायमच काही ठाम वक्तव्यांसाठी आणि त्यांच्या निर्भीड भूमिकांसाठी ओळखले जातात. याच वक्तव्यांमुळे त्यांना अनेकदा अडचणींचाही सामना करावा लागतो. सध्याची प्रकाश राज अशाच एका अडचणीत सापडले आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये रामायणाविषयी काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे व्हायरल होणारा हा व्हिडिओ २०१८मधील एका मुलाखतीचा आहे. 

योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी आपलं मत मांडलं होतं. योगींकडून ज्याप्रमाणे रामलीलाचा प्रचार करण्यात येत आहे हे पाहता काही सामाजिक घटकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतस असल्याचं मत त्यांनी मांडलं. यावर, लोकाग्रहास्तव उत्तर प्रदेश सरकारने रामलीला या सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन का करु नये असा प्रश्न त्यांच्यापुढे मांडण्यात आला. याच प्रश्नाचं उत्तर देत, लहान मुलं पॉर्न पाहत असल्यास तुम्ही त्यांना अडवणार नाही का?, हा प्रतिप्रश्नच त्यांनी मुलाखतकारांपुढे उपस्थित केला. 

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'रामलीला' कार्यक्रमांप्रतीचा संताप स्पष्टपणे मांडला. मुंबईतील काहीजण (मॉडेल) या कार्यक्रमांमध्ये राम, लक्ष्मण, सीतेचा वेश  धारण करुन थेट हॅलिकॉप्टरमधून आले हे आपल्याला भावलं नसल्याचं राज यांनी स्पष्ट केलं. लहान मुलं पॉर्न पाहत असतील तर, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला. 

समाजास या गोष्टी कशा प्रकारे घातक आहेत हेसुद्धा त्यांनी सांगितलं. एखाद्यासाठी संस्कृती म्हणजे मंदिरात जाऊन प्रार्थना करणं असून, जनमानसात असं 'नाटक' करणं नव्हे ही बाब मांडत राम, लक्ष्मण आणि सीता यांनी हॅलिकॉप्टरमधून येणं आपल्याला पटलं नसल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर प्रकाश राज यांचं हे वक्तव्य पाहता त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. रामलीलेची तुलना चाईल्ड पॉर्नशी केल्याचं म्हणत त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी हरकत दर्शवली आहे.