निर्मात्यांनी काम देण्यास नकार दिल्यानंतर राखीने उचलले होते हे पाऊल

अभिनेत्री राखी सावंतला जेव्हा निर्माता काम देण्यास नकार देत होते तेव्हा तिने आपले रंग-रुप उजळण्यासाठी सर्जरी केली होती. अशी माहिती खुद्द राखीने दिलीये. राखीचे खरे नाव नीरु भेदा आहे. तिने वीकेंड चॅट शो जज्बात संगीन से नमकीन तक च्या एका एपिसोडचे शूटिंग केले. जेव्हा या  शोचे होस्ट राजीव खंडेलवाल यांनी राखीला नीरु म्हणून हाक मारली तेव्हा राखी भावुक झाली.  

Updated: Jun 1, 2018, 11:26 AM IST
निर्मात्यांनी काम देण्यास नकार दिल्यानंतर राखीने उचलले होते हे पाऊल title=

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतला जेव्हा निर्माता काम देण्यास नकार देत होते तेव्हा तिने आपले रंग-रुप उजळण्यासाठी सर्जरी केली होती. अशी माहिती खुद्द राखीने दिलीये. राखीचे खरे नाव नीरु भेदा आहे. तिने वीकेंड चॅट शो जज्बात संगीन से नमकीन तक च्या एका एपिसोडचे शूटिंग केले. जेव्हा या  शोचे होस्ट राजीव खंडेलवाल यांनी राखीला नीरु म्हणून हाक मारली तेव्हा राखी भावुक झाली.  

राखी म्हणाली, मला माझ्या कुटुंबाने एंटरटेनमेंट क्षेत्रात जाण्यासाठी कधीच परवानगी दिली नाही. जेव्हा ते मला नाचताना बघायचे तेव्हा खूप मारहाण करायचे. जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा अनेक निर्मात्यांसमोर मी डान्स करण्यास आणि आपली प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी मी विचार केला अशा विचारशून्या लोकांसमोर नाचण्यापेक्षा मी बारमध्ये डान्स करेनन. अनेकदा नकार मिळाल्यानंतर मी लूक आणि रंग रुप उजळण्यासाठी मी सर्जरीची मदत घेतली. सर्जरी रुममध्ये मी नीरु भेदा म्हणून गेली होती. मात्र जेव्हा मी बाहेर आले तेव्हा राखी सावंत होते.

 

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on