माळरानावर रमलाय अभिनेता; ओळखलं?

साताऱ्याचं रोपटं दक्षिणेतं वाढलं.... 

Updated: Nov 5, 2019, 10:43 AM IST
माळरानावर रमलाय अभिनेता; ओळखलं?

मुंबई : सातारा ते टॉलिवूड स्टार असा प्रवास करणारा हा अभिनेता. दिग्गज मंडळींसोबत काम करूनही पाय जमिनीवर ठेवणारा अभिनेता म्हणून याची ओळख. सिनेजगतात कितीही उंची गाठली तरी पाय महाराष्ट्राच्या मातीतच पाय रोवून उभा असलेला हा 'झाडवेडा माणूस' म्हणजे अभिनेता सयाजी शिंदे. 

आपल्या कसदार अभिनयासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला हिरवागार करण्याचा प्रयत्न करणारे सयाजी शिंदे. सयाजी शिंदे झगमगत्या सेटबरोबरच हिरव्यागार माळरानावर देखील रमताना दिसतात. 'सह्याद्री देवराई'च्या माध्यमातून सयाजी शिंदे महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात झाडे लावण्याचं काम करत आहेत. 

सयाजी शिंदेंनी आपल्या सोशल मीडियावर माळरानावरची फोटो शेअर केले आहेत. ज्यामधून हा अभिनेता या माळरानावर किती रमतोय हे अगदी सहज कळतं आहे. 

एक आपलं झाडं, त्याची तिथेच होणार वाढ.... खरखरीत मायाळू खडा, त्याला झाडाचा पडलाय वेढा दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एकच मशाल... असं म्हणाणारा हा अभिनेता निसर्गाशी संवाद साधताना दिसतो. 'हिरवी मशाल' हातात धरून सयाजी शिंदे संपूर्ण महाराष्ट्र हिरवंगार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सयाजी शिंदे म्हणतात की, झाडं हा एक विचार राबवायचा असेल, तर तो आतून उगवायला पाहिजे. जर तो उगवला तर तो आपण राबवायला पाहिजे.

सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी आणि टॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. पण आजही ते आपल्या मातीशी जोडले आहेत. सयाजी शिंदे यांना तुम्हाला कोणतं झाडं आवडतं? असं विचारल्यावर ते म्हणतात, 'माणसाने थोडं चाललं पाहिजे. चालल्यावर कोणत्याही झाडाची सावली आपल्याला थंडावा देते.'