सोनू सूदच्या अडचणीत वाढ, करण्यात आलाय नवा आरोप

आयकर प्रकरणात अडकलेल्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Updated: Sep 18, 2021, 12:49 PM IST
सोनू सूदच्या अडचणीत वाढ, करण्यात आलाय नवा आरोप

मुंबई : आयकर प्रकरणात अडकलेल्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सलग तीन दिवस छापेमारी केल्यानंतर आयकर  विभागाने पत्रकार परिषदेत सांगितले की अभिनेता सोनू सूदने तब्बल 20 कोटी रूपयांपेक्षा जास्त कर चुकवलं आहे. संबंधित कारवाईनंतर, सीबीडीटी (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस) ने माहिती दिली की बॉलिवूड अभिनेता आणि त्याच्या निगडीत जागांवर छापेमारी केल्यानंतर करचोरीचे पुरावे हाती लागले आहेत. 

सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, गुरुग्राम आणि दिल्लीसह एकूण 28 ठिकाणी सलग तीन दिवस सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानंतर त्याठिकाणांहून असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी रक्कम जमा करण्यात आली आहे.  त्यामुळे आता सोनूवर पुढील कारवाई काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, बुधवारी सोनूच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले. त्यामुळे आता सोनूच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुधवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनूशी निगडीत असलेल्या 6 जागांवार छापेमारी केली आहे. 

सोनू सूदचे आर्थिक रेकोर्ड, उत्पन्न, अकाउंट बुक, खर्चाशी संबंधित डेटाची छाननी केली सोनूच्या घरी छापेमारी सुरू असल्यामुळे आम आदमी पार्टी नाराजी  व्यक्त केली आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोनूला पाठिंबा दर्शविला आहे.