Alia Bhatt आणि Ranbir Kapoor च्या लग्नाची तारीख ठरली?

अलीकडेच या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे.

Updated: Mar 12, 2022, 07:44 PM IST
 Alia Bhatt आणि Ranbir Kapoor च्या लग्नाची तारीख ठरली? title=

मुंबई : आलिया भट्ट सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि अलीकडेच या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे.

यासोबतच आलिया तिच्या पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत आहे आणि आता पुन्हा एकदा बातमी समोर येत आहे की, आलिया लवकरच बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

आतापर्यंत दोघांच्या लग्नाच्या अनेक तारखा समोर आल्या आहेत, आता नवीन तारीख समोर आली आहे. या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित नवीन अपडेट्स समोर येत आहेत. .

खरं तर, आलिया आणि रणबीर 2021 मध्येच लग्न करणार होते, पण कोरोनामुळे या जोडप्याने सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. आता बातमी समोर येत आहे की, ऑक्टोबर 2022 मध्ये हे कपल सात फेऱ्या घेतील, असं बोललं जात आहे.

रणबीर कपूरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, जर कोरोना महामारी आली नसती तर एप्रिल 2021 मध्येच त्याने आलिया भट्टशी लग्न केले असते.