Video: 'काय कारताय, ही प्रायव्हेट...' अचानक पापाराझींवर भडकली आलिया भट्ट, व्हिडीओ तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया पापाराझींवर खूप चिडलेली दिसत आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 8, 2024, 12:54 PM IST
Video: 'काय कारताय, ही प्रायव्हेट...' अचानक पापाराझींवर भडकली आलिया भट्ट, व्हिडीओ तुफान व्हायरल  title=

Alia Bhatt Get Angry On Paparazzi: आलिया भट्ट सध्या तिच्या अनेक मोठ-मोठ्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. अनेक तुम्ही पाहिले असेल की ती पापाराझींना पाहून स्माईल आणि मनमोकळ्या पणाने लूक देताना दिसत असते. मात्र, आता आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 ज्यामध्ये आलिया ही पापाराझींवर भडकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया आधी इमारतीच्या आत जाते आणि नंतर ती थोडी बाहेर येते आणि पापाराझींवर भडकते. 

व्हायरल व्हिडीओमध्ये काय? 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आलिया भट्टने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट कारमधून खाली उतरून इमारतीत जाताना दिसत आहे. दरम्यान, यावेळी काही फोटोग्राफर्स तिचा पाठलाग करून बिल्डिंगमध्ये जाताना दिसत आहेत. ज्यामुळे पापाराझींवर आलिया भट्ट भडकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, पापाराझी हे तिच्या घराच्या लिफ्टपर्यंत तिला फॉलो करत आहेत. अभिनेत्रीच्या टीमने देखील त्यांना आतमध्ये येण्यास मनाई केली. मात्र, फोटो काढण्यासाठी पापाराझी तिच्या मागे लागले. हे पाहून आलियाला राग आला आणि ती पापाराझींवर भडकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'तुम्ही काय करत आहात. ही खाजगी जागा आहे.'

कारमधून खाली उतरताच तिने न थांबता किंवा पापाराझींना पोज न देता तिच्या इमारतीकडे जात होती. त्यामुळे पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी तिच्या मागे बिल्डिंगमध्ये गेले. हे पाहून तिला राग आला आणि तिने वैयक्तिक जागेपासून दूर राहण्यास सांगितले. व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया म्हणाली की, 'तुम्ही काय करत आहात. ही खाजगी जागा आहे.' पापाराझींच्या त्रासावर आलिया भट्ट संताप व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

यापूर्वी देखील पापाराझींवर भडकली होती आलिया

याआधी देखील आलियाने एकदा तिच्या गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली होती. जेव्हा एका फोटोग्राफरने तिच्या घरापासून काही अंतरावर खाजगी फोटो काढले होते. राहाच्या जन्मानंतरही आलिया आणि रणबीरने पापाराझींना त्यांच्या मुलीचे फोटो न काढण्याची विनंती केली होती. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर या दोघांनी राहाला पापाराझींसोबत आमने-सामने केले होते. आलिया लवकरच 'जिगरा' आणि 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.