Ganesh Chaturthi Celebration: अर्पिता खानच्या घरी गणपती उत्सव, सलमानने केली भाचीसोबत बाप्पाची आरती

सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी गणपती उत्सव. बाप्पाच्या सेलिब्रेशनमध्ये सलमान खान आणि त्याची खास मैत्रीण यूलिया वंतूरही दिसली.

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 8, 2024, 01:00 PM IST
Ganesh Chaturthi Celebration: अर्पिता खानच्या घरी गणपती उत्सव, सलमानने केली भाचीसोबत बाप्पाची आरती title=

Ganesh Chaturthi Celebration: बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी शनिवारी त्यांच्या घरी गणेश चतुर्थी साजरी केली. यावेळी अर्पिता खानचे संपूर्ण कुटुंब गणपती उत्सवात दिसले. या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान देखील गणपतीच्या सेलिब्रेशनमध्ये दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सोहेल खानची मुले निर्वाण आणि योहान खानही दिसत आहेत. या सर्वांनी मिळून गणपती बाप्पाची पूजा केली. सलमान खानने भाची आयतसोबत गणपती बाप्पाची आरती केली. यावेळी सलमान खानने तपकिरी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली होती. यावेळी सलमान खानसोबत अभिनेता वरुण शर्मा, ऑरी आणि यूलिया वंतूर देखील या गणपती उत्सवात सहभागी झाले होते. 

पाहा व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सलमान खान शेवटचा या चित्रपटात दिसला

अभिनेता सलमान खान हा शेवटचा 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सलमान खानच्या विरुद्ध भूमिकेत कतरिना कैफ दिसली होती. त्याचबरोबर या चित्रपटात किंग खान शाहरुख खान याने देखील छोटी भूमिका साकारली होती. चाहत्यांकडून देखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती.

सलमान खानचा आगामी चित्रपट

आता अभिनेता सलमान खान त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे. 'सिकंदर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास यांनी केलं आहे. येणाऱ्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. 

सलमान खानचं चाहत्यांकडून कौतुक

सलमान खानचा भाचीसोबतचा आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी अभिनेता सलमान खानचं कौतुक देखील केलं आहे. सोशल मीडियावर सलमान खानचा मोठा चाहता वर्ग आहे.