अमृता सिंगच्या आयुष्यात प्रेम नाहीच! Saif Ali Khan पुर्वी 'या' दोन सेलिब्रेटीसोबतही विस्कटलं लग्न...

आज तिची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलीवूडची टॉप अभिनेत्री आहे. 

Updated: Sep 17, 2022, 01:53 PM IST
अमृता सिंगच्या आयुष्यात प्रेम नाहीच! Saif Ali Khan पुर्वी 'या' दोन सेलिब्रेटीसोबतही विस्कटलं लग्न... title=

Amrita Singh Relationship: अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) ही नव्वदच्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजही तिचे सर्वच चित्रपट हे तिचं चाहते आवर्जून पाहतात. अमृता सिंगच्या प्रोफेशनल लाईफपासून तिच्या पर्सनल लाईफही अनेकदा चर्चेत राहिलं आहे. अमृता सिंगनं चित्रपटातून ब्रेक घेतला असला तरी आज तिची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलीवूडची टॉप अभिनेत्री आहे. 

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्या घटस्फोटामुळे (Saif Ali Khan & Amrita Singh) त्या दोघांची बरीच चर्चा होती. आजही त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा या होत असतात. सध्या अशीच एक अमृता सिंगची स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. ही स्टोरी सध्या अनेक वेळा चर्चेत आली होती. ती म्हणजे सैफ अली खानशी लग्न करण्यापुर्वी एकेकाळी अमृता सिंग भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री आणि त्यानंतर अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये होती. 

समोर आलेल्या माहितीनूसार त्या दोघांसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती आणि त्या दोघांसोबत तिला लग्नही करायचे होते. परंतु रवी शास्त्रीनं (Ravi Shastri) मात्र लग्न करण्यासाठी एक अट ठेवली होती. परंतु ही अट अमृता सिंगला मान्य नव्हती. 

ती म्हणजे रवी शास्त्री यांनी अमृता सिंगला सांगितले होते की लग्नानंतर तिनं काम करणं टाळावं. परंतु अमृताला मात्र हे मान्य नव्हतं. आणि त्यांचे यामुळेच ब्रेकअप झाले. यानंतर अमृताच्या आयुष्यात विनोद खन्ना (Vinod Khanna) आला आणि त्यांनी बंटवारा (Batwara) या चित्रपटात एकत्र काम केले होते.  
 
याच चित्रपटाच्या दरम्यान अमृता आणि विनोद खन्ना यांच्यातली जवळीक वाढली होती आणि दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. अमृताची ही रिलेशनशिप रूक्साना सुलतान यांना आवडली नव्हती. 

पहिले कारण म्हणजे विनोद खन्ना आधीच विवाहित होते आणि दुसरे कारण म्हणजे ते वयाने अमृता सिंगपेक्षा खूप मोठे होते. त्यामुळे हे लग्न झाले नाही. यानंतर अमृता सिंगच्या आयुष्यात सैफ अली खान आला आण या दोघींनी 1991 मध्ये लग्न केले. मात्र लग्नाच्या 13 वर्षानंतर 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.