मुंबई : 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग तिच्या फिल्मी करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. सैफ अली खानसोबतच्या नात्यामुळे अमृता सिंग आजही चर्चेत असल्याचं दिसून येतं.
सैफ आणि अमृताच्या घटस्फोटामागील अनेक कारण हळहळू उघड होत आहेत. सध्या अमृता सिंग लाईम लाईट पासून दूर आहेत. त्यांची लेक सारा अली खान आणि मुलगा इब्राहीम अली खान ( Ibrahim Ali Khan ) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
सैफ अली खानने अमृता सिंगसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री करिना कपूरसोबत लग्न केले. त्याच्या करिनासोबतच्या अफेअरमुळे अमृता सिंग खूपच चर्चेत राहिल्या.
सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी अमृता सिंगच्या आयुष्यात देखील कोणीतरी होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंगचं पहिलं प्रेम प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यावर होतं. एकेकाळी इंडस्ट्रीत अमृता आणि रवी शास्त्री यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या होत्या.
असे म्हटले जाते की रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांनाही लग्न करायचे होते, पण क्रिकेटरच्या एका अटीमुळे गोष्टी सुरळीत होऊ शकल्या नाहीत. वास्तविक रवी शास्त्रींना अमृता सिंगने लग्नानंतर चित्रपटात काम करणे थांबवावे अशी इच्छा होती पण अमृताने ते मान्य केले नाही.
मात्र, रवी शास्त्रीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृता सिंगच्या आयुष्यात अभिनेता विनोद खन्ना यांची एन्ट्री झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांच्यात 1989 मध्ये आलेल्या 'बंटवारा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जवळीक वाढली होती.
मात्र, अमृता सिंगच्या आईला विनोद खन्ना यांनी आपल्या मुलीशी लग्न करावे असे वाटत नव्हते, यामागे दोन मोठी कारणे होती. पहिले म्हणजे विनोदचे आधीच लग्न झालेले होते आणि दुसरे म्हणजे तो वयाने अमृता सिंगपेक्षा खूप मोठा होता.
त्याचा परिणाम असा झाला की विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांची जोडीही तुटली, अशी देखील माहिती समोर आली होती. यानंतर अभिनेता सैफ अली खान अमृता सिंगच्या आयुष्यात आला आणि 1991 मध्ये अमृता सिंगने सैफसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. त्याच वेळी, लग्नाच्या 13 वर्षानंतर, 2004 मध्ये, परस्पर मतभेदांमुळे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यात घटस्फोट झाला. अमृता आज सिंगल मदर असताना सैफने 2012 मध्ये करीना कपूरशी लग्न केले.