Amruta Subhash : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषचा आज वाढदिवस आहे. आज अमृता तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता ही बॉम्बे बेगम आणि वंडर वूमन या सीरिजमध्ये दिसली होती. बॉम्बे बेगम या सीरिजसाठी तर अमृता खास ओळखली जाते. इतकंच काय तर वंडन वूमन या चित्रपटच्या प्रमोशनवेळी अमृतानं एक प्रेग्नंसी कीटचा फोटो शेअर केला होता. अमृतानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली होती की ती वयाच्या 43 व्या वर्षी आई होणार आहे. पण खरं सांगायचं झालं तर कसं काही नव्हतं. याविषयी अमृतानं स्वत: सांगितलं होतं.
खरंतर, अमृता त्यावेळी प्रेग्नंट नव्हती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमृतानं असं का केलं? तर अमृतानं वंडर वुमन या चित्रपचात अशा एका मुलीची भूमिका साकारली होती. जी महिला वयोमानानुसार खूप उशिरा आई होते. तिच्या या भूमिकेच नाव जया असं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अमृतानं आई होणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता? पण तिनं हे सगळं तिच्या भूमिकेच्या आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलं होतं. दरम्यान, अमृतानं खऱ्या आयुष्यात आई होण्यावर तिचं मत मांडलं आहे.
अमृतानं आजवर तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं नाही. अमृतानं नेहमीच तिचं खासगी आणि प्रोफेश्नल आयुष्य हे वेगळं ठेवलं. पण वंडर वूमन या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत अमृतानं सांगितलं की 'मला असं वाटतं आहे की हा काळ बदलू लागला आहे. आज असे अनेक कपल्स आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मुलं होऊ दिली नाहीत. आम्ही पण अशाच काही कप्लसपैकी एक आहोत. इतकंच नाही तर मला असं वाटतं की आमच्यासारखे असे अनेक कप्लस असतील ज्यांनी त्यांच्या मुलांविषयी काही निर्णय घेतले असतील. बाळ तर सगळ्यांनाच आवडतात. बाळाला जन्म देऊन त्याचा सांभाळ करणं यासाठी खूप जास्त एनर्जी लागते. तर ही एनर्जी तिथे न वापरता दुसऱ्या कोणत्या कामात वापरायला हवी असं आम्हाला वाटतं. आजच्या जगात असे अनेक लोक आहेत जे असा विचार करतात.'
हेही वाचा : 'पैसे देणार नाही म्हणून...', जेनिफर मिस्त्रीच्या कॉल रेकॉर्डिंगनं एकच खळबळ, TMKOC विषयी धक्कादायक खुलासा
अमृता इथेच थांबली नाही तर तिनं पुढे सांगितलं की, 'जसा काळ बदलतोय त्याप्रमाणे लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत आहे. त्यामुळे एक स्त्री ही तिच्या कामामुळे देखील पूर्ण होऊ शकते. त्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. तिचं लग्न झालं, तर चांगलं झालं. तिला मूल झालं तर बरं झालं. नाही तर ठीक आहे. तिचं करिअर झालं तर ठीक झालं नाही तर नाही हे मात्र, तसचं राहिलेलं नाही. मुलं आवडणं आणि मुलांना मोठं करणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुलाला वेळ देऊ शकू का? असे अनेक प्रश्न आम्हाला येत होते. त्यामुळे बाळ न होऊ द्यायचा निर्णय घेतला कारण कामावर प्रेम असून आम्ही ते सोडू शकत नाही. आमच्या मित्र - मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. माझी काम करून मी त्यांच्या मुलांसोबत खेळायला जाते.'