Mumbai Drugs Case : NCB घरावर छापा टाकल्यानंतर अनन्या पांडे पोहचली एनसीबी कार्यालयात

एनसीबीने पुन्हा एकदा बॉलिवूडकडे लक्ष वळवलं आहे. 

Updated: Oct 21, 2021, 04:33 PM IST
Mumbai Drugs Case : NCB घरावर छापा टाकल्यानंतर अनन्या पांडे पोहचली एनसीबी कार्यालयात

मुंबई : एनसीबीने पुन्हा एकदा बॉलिवूडकडे लक्ष वळवलं आहे. आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी एनसीबीने छापा मारला आहे. आता अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या कार्यालयात पोहचली आहे. एनसीबीच्या संमन्सनंतर अनन्या एनसीबीच्या कार्यालयात पोहचली आहे. आर्यनच्या चॅटमध्ये चंकी पांडे यांच्या मुलीचा उल्लेख करण्यात आल्यानं आता समीर वानखेडे अनन्याची चौकशी करणार आहेत. याचबरोबर एनसीबी कार्यालयात तिच्यासोबत वडिल चंकी पांडेदेखील उपस्थित आहेत. आता या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीच्या नावामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडची नकारात्मक छाप जगासमोर आली आहे. नुकतंच आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. मंगळवारी 26 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात जामीनावर सुनावणी होणार आहे. 

अभिनेता चंकी पांडेच्या मुलीची अनन्या पांडेची चौकशी होणार आहे. काहि तासांपुर्वी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी एनसीबीने धाड मारली आहे. व्ही व्ही सिंह यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने धाड मारली आहे. व्ही व्ही सिंह हे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला दुपारी 2 वाजता एनसीबीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. 

अभिनेत्रीचं आर्यन खान प्रकरणाशी संबंध?
आर्यन खान प्रकरणाशी हा नवी एनसीबीची धाड असल्याच म्हटलं जात आहे. आर्यन खानच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या चॅटमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख असल्याच म्हटलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडकडे एनसीबीची करडी नजर असल्याचं म्हटलं जात आहे.