अभिनेत्री भूमी पेडणेकर आठ दिवसांपासून रुग्णालयात; फोटो पाहून चाहते चिंतेत

अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना कायम आवडतं. सोशल मीडियावर भूमी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर भूमीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Updated: Nov 22, 2023, 04:32 PM IST
अभिनेत्री भूमी पेडणेकर आठ दिवसांपासून रुग्णालयात; फोटो पाहून चाहते चिंतेत  title=

मुंबई : अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना कायम आवडतं. सोशल मीडियावर भूमी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर भूमीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. नुकतीच भूमीने एक पोस्ट तिच्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे. जी पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. खरंतर अभिनेत्री गेले काही दिवस रुग्णालयात दाखल झाली आहे. 

शेअर केलेल्या पोस्ट माध्यामातून तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे की, तिला डेंग्यूचं निदान झालं आहे. आणि यामुळे ती हेले 8 दिवस रुग्णालयात दाखल झाली आहे. नुकतीच भूमीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

शेअर केलेल्या या पोस्टमध्ये भूमीने लिहीलंय की, ''एका डेंग्यूच्या मच्छरने, मला आठ दिवसांचं  प्रचंड यातना दिल्या. पण आज मला जरा बरं वाटतंय, जस्ट फिलींग लाईक अ वाव. म्हणून मला सेल्फी काढावा लागला. मित्रांनो, सावधगिरी बाळगा, कारण गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. मॉस्किटोस रिपेलेंट्स सध्या आवश्यक आहेत. तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. उच्च प्रदूषण पातळीमुळे आपली बहुतेक रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आली आहे. माझ्या ओळखीच्या काही लोकांना अलीकडे डेंग्यू झाला आहे. पुन्हा एकदा एक अदृश्य व्हायरसने हालत खराब करुन ठेवली आहे.

माझी इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल माझ्या डॉक्टरांचे आभार @hindujahospital @bajankhusrav #DrAgarwal खूप थँक्यू  नर्स , किचन आणि क्लिनींग स्टाफ  तुमची खूप मदत झाली. मी कायम तुमची त्रणी राहिन. सगळ्यात जास्त आई, समू आणि माझी तनु खूप.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लवकर बरी हो अशी प्रतिक्रीया अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंटच्या माध्यमातून दिली आहे. तर अजून एकाने लिहीलंय, तु खूप स्ट्रॉन्ग आहेस, सुंदर आहेस, टॅलेंटेड आहेस. तर अजून एकाने लिहीलंय, भूमी तु मला खूप आवडतेस देव तुला लवकर बरं करो. अशा अनेकजण कमेंट करत भूमीला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.