मुंबई : काही चेहरे आणि काही कलाकार कला जगतामध्ये प्रसिद्ध होतात. पण, त्या कलाकारांना या क्षेत्रात करावा लागलेला संघर्ष या झगमगाटाची वेगळी बाजू प्रकाशात आणतो आणि तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य पुरते हादरून जातात.
असाच अनुभव सांगत नुकताच एका अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आणि एकच खळबळ माजली.
ही अभिनेत्री म्हणजे एरिका फर्नांडिस. सध्या गाजणाऱ्या आणि चित्रपटसृष्टीत बऱ्याच चर्चा रंगवणाऱ्या दाक्षिणात्य कला जगतामध्येही एरिकाची कामगिरी पाहता आली.
पण, इथे तिचा अनुभव फारसा चांगला नव्हता. तिनं तिथं बॉडी शेमिंगचा सामना केला. जिथे अनेकदा तिला आपण अपमानित असल्याच्या भावनेनं ग्रासलं.
ते मला ....
त्या अनुभवांविषया सांगताना एरिका म्हणाली, 'मी फारच बारीक होते. थोडी लाजरीही होते. तेव्हा माझी अंगकाठी बारीक होती. दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांना जशा हव्या असतात मी तशी नव्हते.
त्यांना महिलांचा मादकपणा अधोरेखित करायचा होता. ज्यामुळं ते मला पॅडने भरत असत. मला खुप सारं पॅडिंग वापरावं लागत होतं'.
मांडीपासून शरीराच्या प्रत्येक भागाला पॅडींग केलं जात होतं, असं सांगत हे सारं मन हेलावणारं आणि अपमानास्पद वाटत होतं, असं एरिका म्हणाली.
एक व्यक्ती जशी आहे, त्याचा तुम्ही तसाच स्वीकार नाही करत आहात ही बाब किती दुर्दैवी आहे असं एरिका मुलाखतीत म्हणाली.
आपल्या शरीरावर सतत असणाऱ्या पॅडिंगनं तिला प्रचंड त्रास झाला. पण, पुढे काळ बदलला असं एरिकानं सांगितलं.
सध्या परिस्थिती आणि लोकांची विचारसणा बदलली असल्याचं म्हणत ही बाब दिलासा देणारी असल्याची प्रतिक्रिया एरिकानं दिली.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एखाद्या महिलेला पडद्यावर दाखवताना तिच्यातील मादकपणाच अधिक अधोरेखित करण्यासाठी केलं जाणारं पॅडिंग आणि तत्सम सर्व प्रकार हे बरेच अपमानास्पद होते हीच धक्कादायक बाबप एरिकामुळं समोर आली.