'मिस हवाहवाईची' लेकही सुपरडान्सर... पाहा तिचा 'बेली डान्स'

 'मिस हवाहवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.

Updated: Jun 17, 2019, 12:38 PM IST
'मिस हवाहवाईची' लेकही सुपरडान्सर... पाहा तिचा 'बेली डान्स'

मुंबई : 'मिस हवाहवाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या जान्हवीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी चक्क 'बेली डान्स' करताना दिसत आहे. जान्हवीचा हा अंदाज पाहता ती देखील आईप्रमाणेच नृत्यकलेत पारंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा नृत्य आविष्कार चाहत्यांना आकर्षित करत आहे. 'धडक' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि दिग्दर्शन शशांक खैतान यांनी दिलेले अव्हान स्वीकारत जान्हवीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

janhvikapoor belly dancing moves 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी लवकरच 'रूह अफजा' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. दिनेश विजन, मृगदीप सिंग लांबा यांच्या द्वारे चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.   

चित्रपटाचे दिग्दर्शनाची जबाबदारी हार्दिक मेहता यांच्या खांद्यावर आहे. २० मार्च २०२० चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. शिवाय जान्हवी 'तख्त' चित्रपटाच्या चित्रिकरणात देखील व्यग्र आहे.