क्षणात चिडल्या, मग हसल्या; जया बच्चन यांचा VIDEO पाहून नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया

Jaya Bachchan News: जया बच्चन यांची अनेकदा चर्चा रंगेलली असते. आताही त्यांचीच चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात पुन्हा एकदा त्यांचा पापाराझींसमोरील राग व्यक्त झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 17, 2023, 01:50 PM IST
क्षणात चिडल्या, मग हसल्या; जया बच्चन यांचा VIDEO पाहून नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया title=
actress jaya bachchan again shows anger towards paps video viral

Jaya Bachchan News: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे जया बच्चन यांची. काल हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी जया बच्चन यांचा पुन्हा पारा चढलेला दिसतो आहे. त्यामुळे नेटकरीही त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल करणं विसरले नाहीत. आपण अनेकदा पाहिलंच आहे की ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या अनेकदा संतापताना दिसतात. यावेळीही त्यांचा पारा तापलेलाच होता. त्यामुळे नेटकरीही त्यांना ट्रोल करतात. सध्या व्हायरल झालेल्या त्यांच्या व्हिडीओवरूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

खरंतर आपले सतत कोणीतरी फोटो घेतेय हे पाहून किंवा व्हिडीओ घेतेय हे पाहून कोणीही संतापू शकेल परंतु जया बच्चन तर त्यातही प्रो मॅक्स आहेत. परंतु गमतीचा भाग सोडला तर ज्येष्ठ अभिनेत्रींना आदर आणि त्यांच्यासोबत आदबीनं पेश येयला हवं हे आपल्याला शिकून घेण्यासारखं आहे. यावेळी त्या रश्मी ठाकरे आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांच्यासोबत स्पॉट झाल्या. 

आपल्या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा काल 75 वा वाढदिवस दिमाख्यात साजरा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रंगलेली होती. आताही त्यांचीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या खास सोहळ्याला या संध्याकाळी नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. यावेळी सलमान खान, जॅकी श्रॉफ, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, रवीना टंडन, राणी मुखर्जी, विद्या बालन, जितेंद्र इत्यादी कलाकारांनी हजेरी लावली होती. बरेचसे बॉलिवूड सुपरस्टार यावेळी दिसले नाहीत. त्यातून सनी देओल आणि बॉबी देओलही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. परंतु यावेळी जया बच्चन यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

हेही वाचा : VIDEO: दिव्यांग चाहत्यासाठी 'पुष्पा'ची दिलदार कृती, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद

यावेळी त्यांनी सुंदर अशा पंजाबी ड्रेस घातला होता. ज्याची ओढणी जॅकेट स्टाईल खूप सर्रस होती आणि ड्रेस एमब्रोयडरीचा होता. त्यांच्या ड्रेसचे कलर पॅलेटही प्रचंड सुंदर होते. फोटो काढण्यासाठीही त्या यावेळी फोटोग्राफर्ससमोर उभ्या राहिल्या आणि तेव्हा फोटोग्राफर जे बोलले त्यावरून त्या थोड्याश्या नाराज झाल्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नंतर ओरडणाऱ्या फोटोग्राफर्सनाही ते गप्प करत होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळी फोटोग्राफर्स त्यांना त्यांनी कोणत्या दिशेला उभे राहावे म्हणजे ते फोटो काढतील हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जया बच्चन यांनी 'मला तुम्ही डिरेक्शन सांगू नका' असं खडसावून सांगितले. तेवढ्यात त्या थोड्या हसल्यादेखील. हे पाहूनही काहींना आश्चर्य वाटले. यावेळी व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर त्यांचे मूड स्विंग्स होत आहेत असं म्हटलं आहे.