काजल अग्रवालच्या जिद्दीला सलाम; गरोदरपणात काय शिकतेय पाहिलं?

येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा आनंद साजरा करताना काजलला पाहून अनेकांनाच तिचा हेवा वाटत आहे.   

Updated: Jan 20, 2022, 05:24 PM IST
काजल अग्रवालच्या जिद्दीला सलाम; गरोदरपणात काय शिकतेय पाहिलं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री काजल अग्रवाल तिच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याच्या स्वगतासाठी तयार झाली आहे. अर्थात सध्या काजल गरोदर आहे. या काळात तिचा उत्साह आणि कुतूहल हे वेगळ्यात उंचीवर आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा आनंद साजरा करताना काजलला पाहून अनेकांनाच तिचा हेवा वाटत आहे. 

फिटनेसपासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत ती काळजी घेताना दिसत आहे. बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी काही महत्त्वाचे निर्णयही ती घेत आहे. 

गरोदरपणाच्या काळात एक जिद्द मनाशी बाळगत काजलनं प्रीनेटल क्लासही सुरु केले आहेत. 

आता तुम्ही म्हणाल हे कसले क्लास, तर काजलनंच इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला, जिथे तिनं आपल्या या क्लासची माहिती दिली. 

प्रीनेटल क्लास म्हणजे काय ? 
प्रीनेटल क्लासमध्ये महिलांना गरोदरपणा आणि पालकत्त्वाशी संबंधित बरीच माहिती दिली जाते. प्रसूतकाळासाठी महिलांना मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं. 

गरोदरपणाच्या काळातील जीवनशैली, गरोदरपणात आणि प्रसूतीनंतरच्या काळाचील मानसिकता, चांगील जीवनशैली, प्रसूतकळा आणि त्यादरम्यान उदभवणारी परिस्थिती अशी सखोल माहिती दिली जाते. 

काजल, सध्या या क्लासच्या माध्यमातून गरोदरपणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा विद्यार्थीअवस्थेत आलीये, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

2020 मध्ये काजलनं गौतम किचलू याच्याशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाआधी जवळपास सात वर्षे ही जोडी रिलेशनशिपमध्ये होती. आता हीच जोडी त्यांच्या आयुष्याच एका नव्या पाहुण्यासाठी सज्ज होत आहे.