Mouni Roy च्या लग्नाचं Samantha आणि Naga Chaitanya सोबत काय आहे कनेक्शन?

मौनी रॉयने अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

Updated: Jan 20, 2022, 05:08 PM IST
 Mouni Roy च्या लग्नाचं Samantha आणि Naga Chaitanya सोबत काय आहे कनेक्शन? title=

मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय तिचा प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनी आणि सूरजच्या लग्नाला फक्त 6 दिवस उरले आहेत. या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोव्यातील आलिशान डब्ल्यू हॉटेलमध्ये मौनी आणि सूरजचे लग्न होणार असल्याची माहिती आहे. पण आता सध्या सगळीकडे एकच चर्चा होत आहे. मौनी रॉयच्या लग्नाचं समंथा आणि नागा चैतन्यसोबत कनेक्शन जोडलं जात आहे. अशी चर्चा का होतेय याबाबबत अनेकांना पश्न पडला आहे. 

खरंतर नागा चैतन्य आणि समंथा यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला आहे. मग मौनी रॉयच्या लग्नाशी या दोघांचं काय कनेक्शन आहे. 

त्याच कारण म्हणजे समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे लग्नही याच हॉटेलमध्ये झाले होते. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत. 2017 मध्ये नागा आणि समंथा या हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले. रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉय आणि सूरज नांबियार लग्नानंतर कूचबिहारमध्ये रिसेप्शन होस्ट करणार आहेत.

2019 मध्ये, मौनी आणि सूरज नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते. दुबईतील एका नाईट क्लबमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. असे म्हटले जाते की पहिल्याच भेटीत सूरज नांबियारने मौनी रॉयला पसंत केले होते.

सूरजची आई रेणुका आणि वडील राजा यांच्याशीही मौनीचे चांगले संबंध आहेत. रिपोर्टनुसार, मौनी रॉय 27 जानेवारीलालग्नबंधनात अडकणार आहे. 23 जानेवारीपासून मौनीच्या लग्नाचे विधी सुरू होणार असून ते 27 जानेवारीपर्यंत चालणार आहेत.

दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मात्र, अद्याप पाहुण्यांची यादी समोर आलेली नाही. मौनी रॉयने आपल्या अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावर आपलं नाणं प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे वळली.

मौनी रॉयने अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात मौनीला चांगलीच पसंती मिळाली होती. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मौनी लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे.