अभिनेत्री काजोलची अजय देवगनला धमकी, 'आता तू....'

अभिनेता अजय देवगन आणि काजोल ही जोडी सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्सची आवडती जोडी आहे.

Updated: Sep 25, 2018, 10:16 PM IST
अभिनेत्री काजोलची अजय देवगनला धमकी, 'आता तू....'

मुंबई : अभिनेता अजय देवगन आणि काजोल ही जोडी सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्सची आवडती जोडी आहे. यात अजय आणि काजोल एकमेकांची खेचाखेची करत असतात. पण सोमवारी अजय देवगनने कमालच केली, अभिनेत्री काजोलचा मोबाईल नंबर ट्वीटरवर शेअर केला. सोशल मीडियामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आता काजोल अजय देवगनला माफी देण्याच्या मूडमध्ये नसल्याचं दिसून येत आहे.

अजय देवगन ने शेयर किया पत्'€à¤¨à¥€ का WhatsApp नंबर, काजोल बोलीं 'अब घर मत आना'

kajअजय देवगनने ट्वीट करून म्हटलं होतं, काजोल परदेशात आहे, तिच्याशी व्हॉटसअॅपवर संपर्क साधता येईल, असं लिहून अजय देवगनने, एक मोबाईल नंबर शेअर केला. सोशल मीडियावर बायकोशी गंमत करण्याचा या प्रयत्न होता.

काही फॅन्सने या गोष्टीला अतिशय सिरियस घेतलं, अजय देवगनने असं नको करायला पाहिजे होतं, असं देखील काही लोकांनी म्हटलंय. चित्रपटाच्या सेटवर गंमत करणं एक जुनी गोष्ट झाली आहे, असं म्हणत अजय देवगनने ट्वीट केलं होतं, पण काजोलनेही त्याला अतिशय कडक शब्दात उत्तर दिलं आहे. aj

काजोलने अजय देवगनला नेमकं काय धमकावलंय...

अजय देवगनच्या या मजामस्तीवर काजोल चांगलीच चिडलीय आणि तिने आपल्या पतीलाही त्याच्याच स्टाईलमध्ये बुमरँग केलंय, काजोलने ट्वीट करत म्हटलंय, असं वाटतंय तुझे प्रॅन्क्स आता स्टुडिओच्या बाहेर येत आहेत, तेव्हा घरी तुला प्रवेश नाहीय, काजोलने आपला राग दाखवण्यासाठी लालभडक संतापलेली इमोजी देखील यासोबत शेअर केली आहे. तू घरीच ये आता...तुला घरी एन्ट्रीच नाहीय, असं काजोलने अजय देवगनला धमकावलंय...