सावधान! करीनाच्या अशा वागण्यानं Fans ना धक्का

तिनं असं का बरं केलं असावं? 

Updated: Nov 3, 2021, 05:48 PM IST
सावधान! करीनाच्या अशा वागण्यानं Fans ना धक्का  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : एखाद्या कलाकाराला लोकप्रियता तेव्हाच मिळते, ज्यावेळी त्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. चाहते आणि सेलिब्रिटींचं नातं हे मृगजळासारखं आहे. कलाकारांचं वागणं जरासं खटकल्यास हे चाहते त्यांच्याकडे थेट पाठ फिरवतात. याच कारणास्तव जवळपास सर्व सेलिब्रिटी कायमच चाहत्यांना चांगली वागणूक देताना दिसतात. पण, असे काही प्रसंग येतात जे या परिस्थितीला अपवाद ठरतात. (Kareena kapoor khan)

अभिनेत्री करीना कपूर खान हिचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चुकून धक्का लागला म्हणून करीना चाहतीला रागे भरताना दिसत आहे. 

एके ठिकाणहून निघत असताना अभिनेत्रीसोबत फोटो काढण्यासाठी म्हणून काही तरुणी करीनाच्या प्रतिक्षेत उभ्या होत्या. त्याचवेळी करीना तेथे आणि तिच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी या फिमेल फॅन्स घाई करताना दिसल्या. 

हे सर्व सुरु असतानाच एकिचा करीनाला चुकून धक्का लागला. त्याचवेळी तिने करीनाची क्षमाही मागितली. पण, करीना मात्र काहीही ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नसावी. कारण, धक्का लागताच ती चाहतीला रागाच्या भरात काहीतरी बोलताना दिसत आहे. 

रागारागातच ती फोटोसाठीही उभी राहताना दिसते. करीनाचं हे रागीट रुप मात्र चाहत्यांना खटकलं. हा व्हिडीओ नवा नाही, पण करीनाचं असं वागणं मात्र अनेकांसाठी नवं आहे. काहीसं अनपेक्षितही आहे, ज्यामुळं हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आला आहे.