Jr. Kg च्या मुलांना दिलेला अभ्यास पाहून अभिनेत्री हैराण; Video पाहून म्हणाल चुकीचं काय बोलली?

लहानग्या मुलांच्या पाठीवर असणारं अभ्यासाचं ओझं या स्मार्ट युगात प्रत्यक्षरुपात कमी झालेलं नाही

Updated: Aug 22, 2022, 11:22 AM IST
Jr. Kg च्या मुलांना दिलेला अभ्यास पाहून अभिनेत्री हैराण; Video पाहून म्हणाल चुकीचं काय बोलली? title=
Actress kranti redkar shares reel video

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये जसजसा काळ बदलला, तसतसे बरेच बदल झाले. जीवनशैलीपासून ते अगदी शिक्षणव्यवस्थेपर्यंत सर्वकाही बदललं (Education). म्हणजे आजची तरुणाई, जेव्हा काही वर्षांपूर्वी शालेय जीवनाचा टप्पा ओलांडत होती, तेव्हाचं शिक्षण, अभ्यासक्रम जितका वेगळा होता त्याहून दुपटीनं तो आताच्या दिवसांमध्ये बदलल्याचं पाहायला मिळत आहे. 

लहानग्या मुलांच्या पाठीवर असणारं अभ्यासाचं ओझं या स्मार्ट युगात प्रत्यक्षरुपात कमी झालेलं नाही, हीच बाब सध्या पाहायला मिळत आहे. 

अगदी शिशुवर्गातील मुलांना दिला जाणारा अभ्यास पालकांचे डोळे विस्फारत आहे. विश्वास बसत नाहीये, तर तुमच्या आजुबाजूला कोणाची मुलं नुकतीच शाळेत जायला लागली असतील, तर एकदा त्यांच्याशी संवाद साधा. 

अभिनेत्री क्रांती रेडकर हीसुद्धा अशाच पालकांपैकी एक. तिनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती आपल्या Jr. Kg मधील मुलांना दिलेला अभ्यास सर्वांना दाखवताना दिसत आहे. 

शरीराच्या आंतरेंद्रियांची आकृती काढण्याचा अभ्यास आपल्या मुलांना दिल्याचं सांगताना आपण हृदयाची आकृती काढल्याचं क्रांतीनं सांगितलं. बरं, ही आकृती दोनदा काढली, कारण आपल्याला जुळी मुलं आहेत असंही तिनं स्पष्ट केलं. (Actress kranti redkar shares reel video)

मुलांना मिळालेला हा गृहपाठ पाहून क्रांतीच्याही भुवया उंचावल्या. ही आकृती आपण साधारण आठवी- नववीमध्ये काढली असल्याचं म्हणत तिनं या व्हिडीओला एक उपरोधिक कॅप्शनही दिलं. 

मुलांच्या आकलन क्षमतेपलीकडे जाऊन सध्या शिक्षणसंस्थांकडून केला जाणारा अभ्यासाचा हा भडीमार त्या लहानग्यांना कितपत झेपतो, हे पाहणंही गरजेच आहे. यावर तुमचं काय मत?