...म्हणून गर्भपात करावा लागला, अभिनेत्रीच्या Secret नं एकच खळबळ

रिलेशनशिपमध्ये होतो तो एरव्ही महिला, त्यांचे हक्क अशा सगळ्या गोष्टींवर परखड मतं मांडत असतो

Updated: Apr 11, 2022, 12:45 PM IST
...म्हणून गर्भपात करावा लागला, अभिनेत्रीच्या Secret नं एकच खळबळ  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : प्रत्येक नातं एकमेकांहून फार वेगळं असतं. नात्यात येणारी वळणंही तितकीच अनपेक्षित असतात. अशा या नात्यामध्ये तेव्हा अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा होणारा घाव हा जिव्हारी लागतो. त्यातही नातं प्रेमाचं असल्यास वेदनांची तुलना न केलेलीच बरी. 

सध्या आपल्या अशाच काहीशा खासगी आयुष्याविषयी एका अभिनेत्रीनं मोठा गौप्यस्फोट केला आणि पाहता पाहता सर्वांना धक्काच बसला. एका अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील नूर आपण जेव्हा पाहून त्याची प्रशंसा करतो, तेव्हा तिच्या या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे दडलेल्या वेदनांचा विचार कधी केलाय का ? 

एका रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री मंदना करिमी हिच्यासोबत घडलेल्या काही प्रसंगांवरून काही गोष्टी अधीक स्पष्टपणे समोर आल्या. 2017 मध्ये मंदनानं गौरव गुप्ता या व्यावसायिकाशी लग्न केलं. पण, हे नातं 5 महिनेच टिकलं. कौटुंबीक हिंसा आणि तत्सम अनेक गंभीर आरोप तिनं पतीच्या कुटुंबावर केले होते. (mandana karimi pregnent)

यानंतर मंदना एका नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आपण एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा गौप्यस्फोट तिनं Lock Upp या कार्यक्रमात केला. या कार्यक्रमामध्ये तिनं त्यावेळी आपण बाळाचाही विचार करत असल्याचं सांगितलं. 

नातं बदलत होतं, जेव्हा मंदना गरोदर राहिली त्यावेळी मात्र तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या 'त्यानं' बाळाचा स्वीकार करण्यास नकार दिला, ज्यामुळं तिला गर्भपात करावा लागला होता. 

हा दिग्दर्शक नेमका कोण ही बाब तिनं गुलदस्त्यात ठेवली. पण, या कटू आठवणी समोर आल्या आणि तिच्या आसवांचा बांध फुटला. आपण ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो तो एरव्ही महिला, त्यांचे हक्क अशा सगळ्या गोष्टींवर परखड मतं मांडत असतो असंही म्हटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

जीवनात ज्या व्यक्तींचा चेहरा समाजाला दिसतो, त्या मनातून तशाच असतात असं नाही. त्यांचा समाजाला न दाखवण्याचा एक वेगळा चेहरा आणि त्याहूनही तितकीच वाईट प्रकृतीही असू शकते हेच मंदनाचा हा अनुभव सांगून गेला.