वयाच्या 45 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री आहे खूपच हॉट... Photo होतायत व्हायरल

ही चर्चा आहे ती पुजाच्या फिटनेसमुळे आणि स्टायलिश लुकमुळे.

Updated: Sep 26, 2022, 09:13 PM IST
वयाच्या  45 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री आहे खूपच हॉट... Photo होतायत व्हायरल title=

Pooja Batra Hot Photos: पूजा बत्रा ही अभिनेत्री सौंदर्यांच्या बाबतीत कमी नाही (Actress Pooja Batra). तिनं आज पर्यंत अनेक मालिकांमधून आणि वेबसिरिजमधून काम केलं आहे. मध्यंतरी ती फारशी काही प्रोजेक्ट्समध्ये दिसत नव्हती परंतु सध्या तिची सगळीकडे जोरात चर्चा आहे. (actress pooja batra shares a new traditional look photo netizens reacts)

ही चर्चा आहे ती पुजाच्या फिटनेसमुळे आणि स्टायलिश लुकमुळे (Pooja Batra Stylish Look). पुजा आपल्या इन्टाग्राम पेजवरून आपल्या चाहत्याचं लक्ष आपल्या हॉट आणि आकर्षक फोटोंजनी वेधून घेते. नुकताच तिनं आपला असाच एका फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सध्या इंटरनेटवरचं तापमान गरम झालं आहे. (Pooja Batra Instagram Post)

आजपासून नवरात्र सुरू झाली आहे तेव्हा अभिनेत्री पूजा बत्राने अनोख्या पद्धतीने नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्रीच्या निमित्तानं तिनं आपला एक खास लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

पूजा सोशल मीडिया प्रेमी आहे. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे लूक शेअर करत असते. पूजा बहुतेक पोस्टमध्ये वर्कआउटचे फोटो (Workout Photos) किंवा स्टायलिश लुकचे फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढत आहे. चाहते दररोज तिच्या नव्या लूकची वाट पाहत असतात. यावेळी पूजानेही तिच्या फोटोसह चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोत तिनं ट्रेडिशनल लुक केला आहे. लेहेंग्यात पूजा बत्रा ग्लॅमरस दिसत आहे. पूजाने सोनेरी रंगाचा हेवी सिक्वेन्स लेहेंगा आणि लाल दुपट्टा घातलेला दिसत आहे. तिने हेवी गोल्डन ज्वेलरी घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. (Traditional Look)

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यादरम्यान पूजाने गुलाबी रंगाचा चमकदार मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या टोन्ड फिगरवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

2021 मध्ये तिनं 'स्क्वॉड' (Scold) नावाच्या चित्रपट केला होता त्यानंतर पूजा लवकरच दुसऱ्या चित्रपटात दिसण्याची आशा आहे.