अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुपचूप बांधली लग्नगाठ?

नुकताच प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Jan 8, 2023, 08:17 PM IST
अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुपचूप बांधली लग्नगाठ? title=

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्लॅनेट मराठीवर नुकत्याच भेटीला आलेल्या रानबाजार या वेब सिरीज मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.तिची ही वेबसिरीज प्रचंड गाजली.  सोज्वळ गोंडस प्राजक्ताने बोल्ड पात्र साकारलेलं पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

अनेकांना प्राजक्ताची ही भूमिका आवडली असली तरी अनेकांना प्राजक्ताचं हे कॅरेक्टर खटकलं. यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. 
 
नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ आपल्याला फक्त पाय आणि पैंजण दाखवण्यात आले आहेत. प्राजक्ताचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री लग्नबंधनात अडकली असल्याची अटकळ बांधत आहेत. कारण प्राजक्ताने या व्हिडिओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहीलं की, नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही…त्यासाठी ''वाट बघा''.
 
हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हि पोस्ट तिच्या सर्व चाहत्यांना गोंधळात टाकणारी ठरत असली तरी. ही पोस्ट प्राजक्ताने प्राजक्तराज या तिच्या दागिन्यांच्या ब्रँण्डसाठई शेअर केली होती. नुकताच प्राजक्ताने तिच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली. प्राजक्ता तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँण्ड घेवून आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ताच्या या प्राजक्तराज या दागिन्यांच्या ब्रॅण्ड लाँन्चिग सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा पार पडला.