Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत एक चिमुकली दिसत आहे. या चिमुकलीने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती एका लहान स्कुटरवर बसली आहे. ही चिमुकली स्कुटर चालवते आहे. हा चिमुकलीचा गोंडस फोटो आहे.

Updated: Jan 8, 2023, 08:14 PM IST
Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीला हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायचे आहे. 

फोटोत काय?

फोटोत एक चिमुकली दिसत आहे. या चिमुकलीने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती एका लहान स्कुटरवर बसली आहे. ही चिमुकली स्कुटर चालवते आहे. हा चिमुकलीचा गोंडस फोटो आहे. या फोटोवरून या अभिनेत्रीला तुम्हाला ओळखायचे आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

ही चिमुकली मोठी होऊन आता अभिनेत्री बनली आहे.तिने साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तिने बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman khan), मिस्टर पर्फेक्शनिष्ट आमिर खान आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार सोबत सिनेमात झळकली आहे.  

ही आहे अभिनेत्री?

जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, ही अभिनेत्री असीन आहे. असीनचा (Asin) लहानपणीचा फोटो आहे. असिनने तिच्या करिअरची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटातून केली, त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये देखील तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.  

असीनचा (south actress Asin) गजनी हा हिंदी चित्रपट तिच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा होता. या चित्रपटातून तिच्या करिअरचा आलेख अचानक वर गेला. गजनी, रेडी, बोल बच्चन, ऑल इज वेल या चित्रपटांसह असिन अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली आहे.