मुंबई : हिंदी कलाविश्वात वयाच्या ८५व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या म्हणजेच सर्वात वयोवृद्ध नवोदित कलाकार म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री पुष्पा जोशी यांचं मंगळवारी म्हणजेच २६ नोव्हेंबरला निधन झालं. अजय देवगणसोबतच्या 'रेड' या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ट्विट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
''पुष्पा जोशी यांच्या निधनाचं वृत्त कळताच मला फार दु:ख झालं. दिग्दर्शक म्हणून माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय अनुभव विचाराल तर, तो म्हणजे 'रेड'मध्ये त्यांना काम करताना पाहणं'', असं ट्विटमध्ये लिहित तुम्ही जिथे कुठे असाल तिथे कायम आनंदात राहा आणि हा आनंद पसरवत राहा या शब्दांत त्यांनी पुष्पा जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.
Very sad to hear about the passing away of Pushpa Joshi ji. One of the highlights of my directing career was watching you perform in RAID. You were a live wire on and off the sets. Wherever you are you will be smiling and spreading happiness Dadi ji. We will miss you. RIP. pic.twitter.com/TMleLe1oJA
— Raj Kumar Gupta (@rajkumar_rkg) November 27, 2019
वयाच्या या टप्प्यावरही पुष्पा यांचा उत्साह आणि जाहिरातीत अवघ्या काही मिनिटांसाठीसुद्धा दिसणारं त्यांचं रुप या जाहिरातीच्या जमेच्या बाजू ठरल्या. चेहऱ्यावरील स्मितहास्य, अनोखा अंदाज हा पुष्पा जोशी यांना अवघ्या काही काळातच लोकप्रिय करुन गेला होता.