Rekha Unknown Facts: बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा तिच्या सौंदर्यासाठी व अभिनयामुळं आजही अनेकांच्या आवडत्या अभिनेत्री आहे. पण चित्रपटाबरोबरच रेखाचे खासगी आयुष्यही चर्चेत आहे. 1970 मध्ये रेखाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. पण रेखा यांनी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले ते त्यांच्या आईच्या इच्छेसाठी. पाहूयात रेखा यांचे फिल्मि करिअर कसे घडले.
रेखा यांनी सावन भादो या चित्रपटापासून सिने करियरची सुरुवात केली. मात्र हिंदी चित्रपटांआधी त्यांनी साउथ चित्रपटांपासून कारकिर्दीला सुरुवात केली. 1954 साली त्यांना बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रेखा यांची आईदेखील अभिनेत्री होती. त्यांच्याच इच्छेसाठी रेखा यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1966 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट रंगुला रत्नममधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
1970 साली त्यांचा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत तिने स्वतःच्या मेहनतीवर जागा मिळवली. आज रेखा यांची सुपरस्टार म्हणून गणती होते. करिअरच्या सुरुवातीला रेखा यांना त्यांच्या लूकवरुन टोमणेदेखील मिळत आहे. रेखाने तिच्या करिअरबरोबरच तिचा लूकदेखील बदलला. रेखा यांनी या सर्वांकडे लक्ष देत तिच्या कामावरदेखील लक्ष्य केंद्रित केले.
कामाव्यतिरिक्त रेखा यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चाही खूप गाजल्या होत्या. रेखा यांचा पहिला चित्रपट सावन भादो या रिलीज झाल्यानंतर चित्रपटातील सहकलाकार नवीन निश्चल यांच्यासोबत त्यांचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. जितेंद्र यांच्यासोबतही त्यांचे नाव जोडले गेले. इतकंच नव्हे तर, किरण कुमार, विनोद मेहरा आणि राज बब्बर यांच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा तेव्हा खूप गाजल्या होत्या. मात्र, अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमाच्या चर्चा आजही सांगितल्या जातात. मात्र कधीच त्यांना त्यांचे खरे प्रेम मिळाले नाही. लग्नाच्या अवघ्या सात महिन्यातच त्यांच्या पतीने आत्महत्या केली.
रेखा यांच्या आईला वाटायचे की तिने याच क्षेत्रात करिअर करावे. जिद्दीला पेटून त्यांनी रेखाला अभिनेत्री बनवले. त्यामुळं त्यांचं बालपण खेळण्यांऐवजी सेटवरतीच जास्त गेलंय. पण त्यांच्या करिअरमध्ये रेखा यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, विनोद खन्ना, धर्मेंद्र आणि जितेंद्र यांसारख्या दिग्गद कलाकारांसोबत काम केले आहे.