अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मेट्रोने प्रवास

धावपळीच्या जगात वाहतूक कोंडीची समस्या सामान्य माणसाच्या आयुष्यातील भाग आहे. 

Updated: Jan 11, 2019, 05:18 PM IST
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मेट्रोने प्रवास

मुंबई:आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण आपल्या निश्चित स्थळी पोहचण्यासाठी घाईत असतो.धावपळीच्या जगात वाहतूक कोंडीची समस्या सामान्य माणसाच्या आयुष्यातील भाग आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहने चालवने फार जिकरीचे होत आहे.सामान्य माणसच नाही तर सेलिब्रिटीसुध्दा वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. सेलिब्रिटीसुध्दा वाहतूक कोंडीत तासंतास खोळंबतात. अशाच वाहतूक कोंडीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली. अंधेरीमध्ये वाहतूक कोंडीत अडकलेल्या सोनाली कुलकर्णीला वर्सोवा येथे शुटिंगसाठी पोहचायचे होते. पण वाहतूक कोंडीमुळे तिला निश्चित स्थळी पोहचण्यासाठी उशीर होत होता.वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी तिने आपली गाडी तिथेच सोडली आणि मेट्रो स्थानकातून जाण्याचा निर्णय घेतला.

मेट्रोने प्रवास करण्याचा सोनालीचा पहिलाच अनुभव होता. नियमांचे पालन, फास्ट तसेच सुखद प्रवास म्हणजे मेट्रोचा प्रवास अशी प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णीने दिली. सोनालीचा मुंबई 
मेट्रोने प्रवासाचा पहिलाच अनुभव होता. मेट्रोने वेळेत पोहोचल्याचा अनुभव सोनालीने ट्विटरवर फोटो पोस्ट करत शेअर केला आहे.