बिग बॉसमधून निघाल्यावर तेजस्वीला करण कुंद्राने नेलं घरी, त्या रात्रीचे फोटो व्हायरल

 कारण तेजस्वी प्रकाशपासून एक दिवसदेखील दूर राहणं करण कुंद्राला सहन होत नाही.

Updated: Jan 31, 2022, 04:22 PM IST
बिग बॉसमधून निघाल्यावर तेजस्वीला करण कुंद्राने नेलं घरी, त्या रात्रीचे फोटो व्हायरल title=

मुंबई : बिग बॉस 15 मध्ये सुरू झालेली तेजस्वी आणि करण कुंद्रा यांची प्रेमकहाणी आता घरातून बाहेर पडताच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण तेजस्वी प्रकाशपासून एक दिवसदेखील दूर राहणं करण कुंद्राला सहन होत नाही.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो थेट तिच्या घरी जातो, कुटुंबियांसोबत वेळ घालवतो, पण करण कुंद्राची गोष्ट वेगळी आहे. त्याचे तेजावरचे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर करण तिच्या घरी न जाता थेट तेजस्वीच्या कुटुंबासह स्वत:च्या घरी गेला.

तेजस्वीचे घरी भव्य स्वागत झाले आणि करण कुंद्राही त्यांच्या आनंदात सामील झाला. ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजाच्या आफ्टर पार्टीमध्ये धमाल मस्ती झाली.

ज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. सध्या करण तेजस्वीसोबत गुडगावमध्ये आहे आणि तिच्यासोबत विजय साजरा करत आहे. तेजस्वीचा दिवस खूप खास होता कारण तिला फक्त बिग बॉसची ट्रॉफी मिळाली नाही तर ती एकता कपूरची पुढची नागिन देखील बनली. 

होय, ज्या नागिनची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते, ती दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉसची विजेती आहे.