अभिनेत्री टीना दत्ताचं बोल्ड फोटोशूट, मादक अदा पाहून चाहते घायाळ

बोल्ड लूकमुळे चर्चेत आलेल्या टीना दत्ताने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Updated: Jan 10, 2022, 09:09 PM IST
अभिनेत्री टीना दत्ताचं बोल्ड फोटोशूट, मादक अदा पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : आपल्या अभिनयापेक्षा आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आलेल्या टीना दत्ताने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये टीनाने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. यासोबतच अभिनेत्रीने काउंटरवर बसून बोल्ड पोज दिल्या आहेत.

काउंटरवर बसून केलं फोटोशूट 
या फोटोत टीना दत्ता एका रेस्टॉरंटच्या काउंटरवर बोल्ड पोज देताना दिसत आहे. टीनाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. फोटो शेअर करताच हे तुफान व्बायरल होत आहेत.

पुलोवरसोबत परिधान केली टाइट्स
या फोटोची एक झलक पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की, अभिनेत्रीने फक्त काळा पुलओव्हर घातला आहे. पण जेव्हा तुम्ही नीट बघाल, तेव्हा तुम्हाला कळेल की, अभिनेत्रीनेही अगदी लहान टाइट्स घातली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या हॉट फोटोशूटमध्ये टीना दत्ताचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. अभिनेत्रीने खूप डार्क मेकअप केला असून तिने केस मोकळे ठेवून काळी टोपी घातली आहे आणि पायात बूट घातले आहेत. इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताना टीनाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तिच्या डोळ्यांमधला आत्मविश्वास, तिच्या चेहऱ्यावरील मोहिनी आणि तिच्या उत्कटतेतील चमक... ती तिच्या आयुष्याची गुरु आहे.'