अभिनयासोबत सारा अली खान करू लागली हे काम? फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Updated: Jan 10, 2022, 08:53 PM IST
अभिनयासोबत सारा अली खान करू लागली हे काम? फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा अली खान आज तिच्या सौंदर्य, साधेपणा आणि अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करते. सारा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक चाहत्याला माहित आहे की सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांचं ती मनोरंजन करत असते.

कधी सारा तिच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर चर्चेत असते, तर कधी अभिनेत्री तिच्या चाहत्यांना मजेदार पोस्ट्सने हसवते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही वेगळ्या प्रकारचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये साराची लाईफस्टाईल दिसत आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.खरंतर, साराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आपल्या नवाबी जीवनशैलीला सोडून शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. इतकंच नाही तर मेंढ्यांमध्ये उभी असल्याचं दिसतेय, तीही अगदी साध्या सोबर देसी लूकमध्ये. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा निळ्या रंगाचा कुर्ता, लाल रंगाची सलवार आणि क्रीम रंगाचा दुपट्टा यामध्ये दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री शेतात एका वृद्ध व्यक्तीसोबत उभी असल्याचं दिसत आहे आणि तिच्या मागे अनेक मेंढ्या आहेत. 

दुसऱ्या फोटोमध्ये सारा ट्रॅक्टरच्या वर पोज देताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये सारा हातात काठी घेऊन पोज देताना दिसत आहे.हे फोटो शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'शेळ्यांचं पालनपोषण ट्रॅक्टर ड्रायव्हिंग हे फक्त फोटोचं निमित्त आहे की, हे जगच वेगळं आहे? असा प्रश्न तिने युजर्सला केला.