Adipurush Motion Poster : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं 'आदिपुरुष' च्या टीमनं पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचा एक लिरिकल ऑडियो क्लिप शेअर करण्यात आला आहे. खरंतर या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर हा गेल्या वर्षी शेअर करण्यात आला होता. त्यावेळी त्याच्यातील VFX इफेक्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना हे कार्टून चित्रपटासारखं आहे असं म्हटलं. दरम्यान, आता ऑडियो क्लिप प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु झाली आहे.
त्यासोबत प्रभासचा एक पोस्टरही शेअर करण्यात आला आहे. प्रभास या चित्रपटात श्री राम यांची भूमिका साकारत आहे. हातात धनुष्य बाण धरलेल्या श्री रामांच्या भूमिकेत प्रभास दिसत असून या ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला येत की 'तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे। दुविधा की घड़ी में ये मन तुझको ही पुकारे। तेरे ही बल से है बल हमारा, तू ही करेगा, मंगल हमारा। मंत्रों से बढ़के तेरा नाम, जय श्री राम राजा राम।' ही लिरिकल ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.
हेही वाचा : KKBKKJ Box Office Collection Day 1 : सलमानच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
या चित्रपटाची घोषणा ही 12 जानेवारी 2023 रोजी टीझर शेअर करत केली होती. पण चित्रपटाच्या टीझरला खूप खराब रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली. आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 'आदिपुरुष' चं मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. तर हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त या चित्रपटात सैफ अली खान आणि सनी सिंह यांच्यापण महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये दिसणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुष या चित्रपटाचं बजेट हे 500 कोटी रुपये आहे. अशात आता प्रेक्षकांकडून चित्रपटाला कसा रिस्पॉन्स मिळत आहे ते पाहण्यासाठी लोक उस्तुक आहेत. आता सगळ्यांचे लक्ष चित्रपटामध्ये काय बदल झाले आहेत, याकडे लक्ष लागले आहेत. तर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया असेल यासाठी दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्मात्यांचे लक्ष लागले आहे. तर ओम राऊत यांनी या आधी 'तानाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटामुळे ते चांगलेच चर्चेत होते