अभिनेता आफताब शिवदासानी सायबर क्राईमचा शिकार, एका लिंकवर क्लिक केलं आणि गमावली 'इतकी' रक्कम

Aftab Shivdasani Cyber Fraud : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी हा सायबर क्राईमचा शिकार झाला आहे. एका लिंकवर क्लिक केल्यानं बसला लाखो रुपयांचा दणका.

दिक्षा पाटील | Updated: Oct 11, 2023, 12:39 PM IST
अभिनेता आफताब शिवदासानी सायबर क्राईमचा शिकार, एका लिंकवर क्लिक केलं आणि गमावली 'इतकी' रक्कम title=
(Photo Credit : Social Media)

Aftab Shivdasani Cyber Fraud : बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी हा सायबर क्राईमचा शिकार झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की त्याला एक टेक्स्ट मेसेज आला होता आणि त्यानंतर त्याच्या अकाऊंटमधून 1.50 लाख रुपये गेले. आफताबनं सांगितलं की प्रायव्हेट बॅंकेचा KYC अपडेट करण्यास सांगितलं होते. त्या दरम्यानच त्याचं एवढं मोठं नुकसान झालं. आता पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 

कसा झाला संपूर्ण प्रकार? 

वांद्रे पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की ही सगळी घटना रविवारी झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी त्यांची तक्रार नोंदवण्यात आली. आफताबला एका अनओळखी क्रमांकावरून मेसेज आला. त्यात त्याला बॅंकेशी संबंधीत केवायसी डिटेल्स अपडेट करण्यास सांगितले. त्यासोबतच हे सांगण्यात आले होते की जर त्यानं असं केलं नाही तर त्याचं अकाऊंट सस्पेंड करण्यात येईल. त्यामुळे आफताबनं मेसेजमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केले आणि ज्या-ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सगळ्यांचे पालन केले. त्यानंतर त्याला एक मेसेज आला आणि त्यात लिहिले होते की त्याच्या खात्यातून 1 लाख 49 हजार 999 रुपये डेबिट झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोलिसांनी दिली माहिती

पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं पुढे सांगितले की सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी बॅंकेच्या ब्रान्च मॅनेजरशी संपर्क केला आणि त्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : 'मर्द'च्या सेटवर थोडक्यात बचावलेले अमिताभ बच्चन, 'या' आजारामुळे घशाखाली उतरत नव्हतं पाणी

आफताब आधी 'या' सेलिब्रिटींना बसलाय सायबर क्राईमचा दणका

आफताब विषयी बोलायचे झाल्यास त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात 'मस्त', 'मस्ती' आणि 'हंगामा' सारखे चित्रपट आहेत. आफताब आधी अनेक सेलिब्रिट हे सायबर क्राईमचा शिकार झाले आहेत. त्यात टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफनं 58 लाख रुपयांचा दणका बसला होता.  इतकंच नाही तर अन्नू कूपर यांना देखील KYC अपडेटच्या नावावर 4 लाख रुपयांचा दणका बसला होता.