close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कॅन्सरवर मात करणाऱ्या सोनालीचा 'न्यू नॉर्मल' लूक

सोनालीने हाय ग्रेड कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली आहे.

Updated: Jul 5, 2019, 08:08 PM IST
कॅन्सरवर मात करणाऱ्या सोनालीचा 'न्यू नॉर्मल' लूक

मुंबई : गेल्या वर्षी विदेशात कॅन्सरवर उपचार घेत असणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता पूर्णपणे बरी झाली आहे. सोनालीने हाय ग्रेड कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली आहे. कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर आता तिच्या आयुष्यात किती बदल झाले आहेत हे एका पोस्टद्वारे सोनालीने शेअर केलं आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं असताना तिने सोशल मीडियावर 'न्यू नॉर्मल' लुक शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

कैंसर से जीतकर ग्लैमर वर्ल्ड में मारी रीएंट्री, खास है सोनाली बेंद्रे का यह अंदाज

एक वर्षापूर्वी सोनालीला तिने कॅन्सरवर यशस्वी मात केली असल्याचं सांगण्यात आलं होतं. रूपाली कौर यांच्या 'मिल्क एंड हनी' पुस्तकातील काही ओळी शेअर करत तिने तिचा आधीचा आणि आताचा असा फोटो शेअर केला आहे. #MyNewNormal असा हॅशटॅग वापरत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनालीने तिच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. 

४३ वर्षीय सोनालीने कॅन्सरवर सुरु असलेल्या उपचारादरम्यान तिच्या लुकमध्ये झालेला बदल अतिशय सकारात्मपणे, खुलेपणाने चाहत्यांशी शेअर केला होता. सोनाली आता कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी कामही करत आहे. स्वत:च्या आत्मविश्वसाच्या जोरावर तिने कॅन्सर सारख्या आजारावर मात केली. आता ती तिचं आयुष्य आपल्या कुटुंबासह आणि मित्र परिवारासह स्वच्छंदी जगत असून ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.