Indian Idol 12 : पवनदीप राजन विजेता घोषित झाल्यानंतर अरूणिताबद्दल म्हणाला...

Indian Idol 12 शो संपला तरीही पवनदीप आणि अरूणिताची चर्चा

Updated: Aug 17, 2021, 02:57 PM IST
Indian Idol 12 : पवनदीप राजन विजेता घोषित झाल्यानंतर अरूणिताबद्दल म्हणाला... title=

मुंबई : सिंगिंग रियलिटी शो (Singing Reality Show), इंडियन आयडल 12 ची  (Indian Idol 12) सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली असते. यंदाच्या वर्षीचा इंडियन आयडल आपल्याला भेटला आहे. रविवारी झालेल्या ग्रँड फिनॅलेत पवनदीपने त्याच्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. बक्षीसाच्या स्वरूपात त्याला ट्रॉफी आणि 25 लाख रूपये मिळाले. त्यामुळे पवनदीप एक उत्तम गायक आहे असं म्हणायला हरकत नाही. पवनदीपने आयडलची ट्रॉफी जिंकल्यानंतर आलेला अनुभव शेअर केला आहे. 

इंडियन एक्सपप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पवनदीप म्हणाला, 'जेव्हा मी ट्रॉफी हातात घेतली तेव्हा एक वेगळाचं अनुभव मला आला. जोपर्यंत विजेत्याचं नाव घोषित झालं नव्हत तेव्हा एक वेगळी भावना मनात होती.' शिवाय आपला  विजय आणि ट्रॉफी इतरांसोबत  देखील शेअर करता आली असती तर आणखी आनंद मिळाला असता, असं देखील पवनदीप म्हणाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी अरुणिताला तुझ्या विजयाबद्दल काय वाटतं आसा प्रश्न देखील पवनदीपला विचारण्यात आला. यावर पवनदीप म्हणाला, 'फिनॅलेनंतर आम्हाला काही बोलता आलं नाही. तिने मला शुभेच्छा दिल्या. अरूणिता माझ्या विजयावर अत्यंत आनंदी होती.' सांगायचं झालं तर अरूणिता आणि पवनदीप यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचं स्पष्टिकरण दोघांनी दिला.