घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu चं मोठं स्वप्न झालं पुर्ण

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा आजकाल सतत चर्चेत आहे. 

Updated: Oct 23, 2021, 01:00 PM IST
घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu चं मोठं स्वप्न झालं पुर्ण

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा आजकाल सतत चर्चेत आहे. नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर सामंथा स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या दिवसात सामंथा चार धाम यात्रेला गेली होती. जी आता पुर्ण झाली आहे. त्यांनी बद्रीनाथ मंदिरातील एक फोटो शेअर करून आपली ट्रीप संपल्याची माहिती दिली आहे.

बद्रीनाथ धामला भेट दिल्यानंतर सामंथाने तिचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शिल्पा रेड्डीसोबत चौपरजवळ पोज देताना दिसत आहे. त्यांनी त्यांच्या चार धाम यात्रेचा अनुभव शेअर केला आहे.

हिमालयात जाण्याचे एक स्वप्न 

फोटो शेअर करताना सामंथाने लिहिले - विलक्षण प्रवास संपला. चारधाम यात्रा, यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. मी महाभारत वाचल्यापासून मला हिमालयाची नेहमीच भुरळ पडली आहे. पृथ्वीवरील या स्वर्गात जाणे हे एक स्वप्न राहिले होतं, महान रहस्याचे ठिकाण, देवांचे निवासस्थान.

सामंथाने पुढे लिहिले - मला जे वाटले होते तेच झाले. शांत आणि भव्य.. मिथक आणि वास्तव यांच्यातील गुंतागुंतीचा गोंधळ. हिमालयाला माझ्या हृदयात एक विशेष स्थान असेल आणि ते आणखी खास आहे कारण मला ते तुमच्यासोबत अनुभवण्याची संधी मिळाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

कंगना रानौतची प्रतिक्रिया 

सामांथाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे कंगना रानौत. कंगनाने सामंथाच्या पोस्टवर लिहिले - व्वा .. तसेच हृदयाचे इमोजी पोस्ट केले. त्यांच्या या पोस्टला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सामंथाने या सहलीची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवली.