पतीला सोडलं, पण त्याची ही गोष्ट आजही सोडली नाही, Samantha ची जिद्द आजही कायम

परंतु अभिनेत्री अजूनही एक गोष्ट तिच्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की पाळते.

Updated: Feb 21, 2022, 05:59 PM IST
 पतीला सोडलं, पण त्याची ही गोष्ट आजही सोडली नाही, Samantha ची जिद्द आजही कायम title=

मुंबई : समंथा आणि नागा चैतन्य हे साऊथ इंडस्ट्रीतील पॉवर कपल मानलं जातं. एक काळ असा होता दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

एकत्र राहत असताना त्यांनी एकमेकांची गोष्ट ही आपली सवय बनवली. आता हे जोडपे वेगळे झाले आहे. परंतु अभिनेत्री अजूनही एक गोष्ट तिच्या रोजच्या रुटीनमध्ये नक्की पाळते.

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू स्वतःशी संबंधित एक मोठा खुलासा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्रीच्या आस्क मी एनीथिंग या सेन्शनमधील आहे, जेव्हा एका चाहत्याने तिला फिटनेस फ्रीक असण्याचे कारण विचारले. 

याबाबत उत्तर देताना समंथा लाजते. आणि उत्तर देताना म्हणते, 'आज मी तुमच्यासोबत एक मोठं गुपित उलगडणार आहे. मी नागा चैतन्यमुळे जीमला जायला लागले, कारण तो त्याच जीममध्ये जायचा.  समंथा नागा चैतन्यला प्रेमाने 'चाय' म्हणते. तिचा हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

जर तिच्या फिटनेस बद्दल सांगायचं झालं, तर समंथा फिटनेससाठी खूप मेहनत घेते.ती वर्कआऊटला विशेष महत्त्व देते. तिचा असा विश्वास आहे की यामुळे केवळ पचन क्रिया सुधारत नाही तर आपण स्टाँग बनतो. सोशल मीडियावरील तिचे वर्कआऊट व्हिडिओ आणि फोटो अनेकदा चाहत्यांना फिटनेसची प्रेरणा देतात.