Jaya Bachchan नंतर ही अभिनेत्री कॅमेरा पाहून पापाराझींवर चिडली आणि म्हणाली- 'माझ्या तोंडाच्या आत...'

शिल्पा शेट्टी कुंद्रा अशा बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी पापाराझींना चांगली वागणूक देण्यासाठी ओळखली जाते मात्र यावेळी..

Updated: Nov 17, 2022, 12:06 AM IST
Jaya Bachchan नंतर ही अभिनेत्री कॅमेरा पाहून  पापाराझींवर चिडली आणि म्हणाली- 'माझ्या तोंडाच्या आत...' title=

मुंबई : माध्यमांसमोरच्या विचित्र वागणुकीमुळे जया बच्चन (jaya bachchan) नेहमीच ट्रोल (Troll) होतात. बहुतेक वेळा त्या कुटुंबीयांसोबत असल्या की फोटोग्राफर्सना पाहून त्यांना राग अनावर होतो. 

शिल्पा शेट्टी कुंद्रा अशा बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी पापाराझींना चांगली वागणूक देण्यासाठी ओळखली जाते. प्रत्येक वेळी ती फोटोग्राफर्सना हसत पोझ देते. पण आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून चाहतेही संतापले आहेत.

अनेक लोक तिची तुलना जया बच्चन यांच्यासोबत करत आहेत. जया बच्चन यांचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये अभिनेत्री पापाराझींवर नाराजी व्यक्त करताना दिसली. आता शिल्पा शेट्टीचा हा नवीन व्हिडिओही लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

शिल्पाला आला राग
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिल्पा शेट्टी इमारतीतून बाहेर येताच पापाराझी तिला पोज देण्यास सांगत आहेत. यावर, अभिनेत्री आधी  मस्ती स्टाईलमध्ये फोटोग्राफर्सना अनेक मस्त पोज देते, पण पापाराझी अभिनेत्रीच्या जवळ पोहोचताच अभिनेत्री म्हणते, तोंडात  घुसून लोकांचे फोटो काढा. यादरम्यान अभिनेत्रीच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या. यानंतर शिल्पा तिच्या कारमध्ये बसते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पा कॅज्युअल लूकमध्ये होती
शिल्पा शेट्टीने सिल्व्हर जॉगर्स आणि ब्लॅक क्रॉप टॉप घातला होता. अभिनेत्रीने सनग्लासेस, न्यूड मेकअप, ओव्हरसाईज टोट बॅग आणि स्पोर्ट्स शूजसह तिचा कॅज्युअल लुक पूर्ण केला. मात्र तिथून निघताच शिल्पाने कॅमेरापर्सनला हलकंसं स्माईल दिलं  मात्र कारमध्ये बसत असताना अभिनेत्रीचं डोके गाडीच्या छताला धडकलं. शिल्पाचा हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी लगेच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिलं, 'तुम्ही असं बोललात म्हणून तुमच्या डोक्याला लागला'. याशिवाय आणखी एक यूजर म्हणाला, 'तुम्हीही जया बच्चनसारखं वागयला सुरुवात केली आहे.