मुंबई : हॉलिवूडमधून सुरू झालेली ही #metoo ही कॅम्पेन आता बॉलिवूडमध्ये सुद्धा टॉपवर आहे. बॉलिवूडमध्ये सतत एकच चर्चा आहे ती म्हणजे सेक्सुअल हरॅशमेंट. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. यानंतर एका पाठोपाठ एक हरॅशमेंटच्या गोष्टी समोर येत आहेत. आताच अभिनेत्री कंगनाने सुपरहिट सिनेमा 'क्वीन' च्या दिग्दर्शकावर विकास बहलवर सेक्सुअल हरॅशमेंटचा आरोप लावला आहे.
कंगनाच्या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने विकास बहलवर आरोप लावला आहे. या अभिनेत्रीने मिस मालिनीसोबत ही गोष्ट शेअर केली आहे. मिस मालिनी एक मोठा खुलासा केला आहे की, मी प्रयत्नपूर्वक बघत गेले की, विकास बहलसोबत मी कधीच एकटी राहत नसे. एकदा मिस मालिनी एका पार्टीला गेली होती जिथे 20 लोकं उपस्थित होते. तिथे विकास बहल नशेत असून ते जबरदस्ती मिस मालिनीच्या ओठांवर जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न करत होता. अद्याप या अभिनेत्रीचं नाव समोर आलेलं नाही.
पुढे त्या अभिनेत्रीने सांगितलं की, जेव्हा विकास बहल मला किस करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मी त्याला धक्का देऊन तिथून निघून गेली. मात्र तेव्हा विकासने असं सांगितलं की, त्याने मला जाताना पाहिलंच नाही. विकास कायमच नशेत असल्याच भासवत असतो. मी तिथून गेल्यावर त्याने मला मॅसेज केला की, मला भूक लागली आहे का? एवढंच नाही तर विकास बहलला त्याच्या या स्वभावामुळे अनेकदा नोकरीवरून काढून टाकलं आहे. विकास बहलच्या घटस्फोटीत पत्नीला देखील याबाबत माहित आहेत. तसेच 'फँटम फिल्म्स' मधील एका कर्मचारीने देखील विकास बहलवर आरोप लावला होता की, गोव्यात त्याने तिच्यासोबत गैरव्यवहार केला आहे.