मुंबई : सारा अली खानच्या 'केदारनाथ'सिनेमाची शूटींग सध्या सुरू आहे. तरीही साराला नव्या सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत.
पण 'केदारनाथ' चा दिग्दर्शक अभिषेक कपूरने तिला कोणत्याही सिनेमाच स्वीकारण्यास परवानगी नाकरली आहे.
त्यामुळे हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तिला कोणत्या ऑफर्स स्वीकारायच्या नाहीएत. पण साराने सध्या सिनेमाची कथा ऐकली आहे.
सारा आपली आईसोबत नव्या कथा ऐकत आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार साराला लवकरात लवकर नवा सिनेमा मिळावा यासाठी अमृता सिंहने अनेक दिग्दर्शकांसोबत बोलणी केली आहे.
सारा सध्या २ स्क्रीप्टवर विचार करतेय.
त्यातील एक म्हणजे आशितोष गोवारीकरच्या नव्या सिनेमाची स्क्रिप्ट तिला आवडलीय. यामध्ये अर्जुन कपूर दिसणार आहे.