लग्ननंतर अशी असते Vicky Kaushal ची संध्याकाळ, बेडरूममधला तो फोटो समोर

सध्या विकी त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये आहे.

Updated: Jan 21, 2022, 06:42 PM IST
लग्ननंतर अशी असते Vicky Kaushal ची संध्याकाळ, बेडरूममधला तो फोटो समोर title=

मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटीच्या आयुष्याबद्दल जाणून घेणे त्यांच्या चाहत्यांना फार आवडतं. ते काय करतात, कुठे जातात, कोणते कपडे घालतात? हे जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. ज्याच्या अनेकदा चर्चा देखील होतात. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ देखील त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले. आता त्यांचं लग्न झाल्यानंतर या दोघांचं आयुष्य कसं आहे आणि ते एकमेकांसोबत कसा वेळ घालवतात. हे जाणून घेण्यात देखील लोकांना रस आहे. सध्या या दोघांचा सध्या एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये कतरिना विकीची कशी काळजी घेते हे पाहायला मिळत आहे.

सध्या विकी त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदूरमध्ये आहे. यादरम्यान कतरिना पती विकीसोबत वेळ घालवता यावा यासाठी त्याच्या मागे गेली.

तेथे शूटिंगनंतर कतरिना विकीची काळजी घेताना दिसत आहे. यासंदर्भाती त्याच्या बेडरुममधील एक फोटो समोर आला आहे आणि हा फोटो स्वत: अभिनेता विकी कौशलने शेअर केला आहे.

हा फोटो विकीच्या बेडरूममधला आहे. फोटोत तुम्हीला दिसेल की, त्याच्यासमोर तीन प्लेटमध्ये ठेवल्या आहेत आणि एक ड्रिंक देखील ठेवले आहे. तसेच एक हॉलिवूड चित्रपट देखील टीव्हीवर चालू आहे. हा फोटो शेअर करत विकीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'पोस्ट पॅकअप पॅम्पर!'

इंस्टा स्टोरीवर फोटो शेअर केला

हा फोटो विक्की कौशलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. कतरिना पती विकी कौशलची चांगली काळजी घेत असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होते.

लग्नानंतरची पहिली लोहरी एकत्र साजरी केली

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतरची पहिली लोहरी एकत्र इंदूरमध्ये साजरी केली. दोघांचा लोहरी साजरा करतानाचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी आणि रोमँटिक अंदाजात एकत्र दिसले होते. हा फोटो विकी कौशलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये कतरिना लाल रंगाचा सलवार-कुर्ता घालून नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.