मुंबई : आजकाल भोजपुरी सिनेमाच्या अभिनेत्री हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. अलीकडेच, भोजपुरीचा प्रसिद्ध स्टार त्रिशकर मधूचा एक mms व्हायरल झाला आणि आता अभिनेत्री प्रियंका पंडितचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. प्रियांका पंडितने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका रिपोर्टनुसार, प्रियांका पंडित म्हणली की, हा व्हिडिओ लीक करून तिच्या विरोधात काही कट रचला जात आहे.
जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो तिचा नसल्याचाही ती दावा करतेय. व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. तिचं म्हणणं आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी तिच्यासारखी दिसते, पण त्यात ती स्वतः नाही. एमएमएस व्हिडिओ लीक करून कोणीतरी तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, कोणीतरी माझ्याविरोधात कट रचत आहे असेही प्रियांका म्हणाली. या प्रकरणात ती गप्प बसणार नाही आणि असं करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल.
अभिनेत्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न
या प्रकरणी प्रियंकाने पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. त्याचबरोबर असंही म्हटलं जात आहे की, प्रियांकाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो सायबर सेलच्या मदतीने सर्वत्र काढून टाकण्यात आला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे सध्या त्या लोकांचा शोध घेतला जात आहे. प्रियंकाच्या आधी अभिनेत्री त्रिशाकरचा MMS व्हिडिओ लीक झाला होता.
त्रिशाकरच्या व्हिडिओमध्ये ती एका मुलासोबत दिसली होती, जो तिचा प्रियकर असल्याचं सांगितले जात होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्रिशाकरने ज्यांनी तिच्या सोशल मीडियाद्वारे व्हायरल केले त्यांना चेतावणी दिली होती. ती म्हणाली की, देव सर्व काही पाहत आहे. माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी काही लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. बिहारमध्ये काही खालच्या पातळीचे लोक आहेत याची मी कल्पनाही करू शकत नाही.
प्रियांका आणि त्रिशाकर दोघंही भोजपुरी सिनेमाचे प्रसिद्ध चेहरे आहेत. प्रियंकाबद्दल बोलायचं झालं तर तिने इच्छाधारी, पवनपुत्र, आवारा बालम, तोड दे दुश्मन की नाली राम आणि अली आणि करम युग यासारख्या अनेक भोजपुरी प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.