close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'साहो'नंतर प्रभासच्या मानधनात घसघशीत वाढ

कलाविश्वात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

Updated: Sep 22, 2019, 12:43 PM IST
'साहो'नंतर प्रभासच्या मानधनात घसघशीत वाढ

मुंबई : अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण, 'बाहुबली' या चित्रपटाने त्याच्या अभिनय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. जागतिक स्तरावर प्रभास अनेकांची मनं जिंकून गेला. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही यश मिळालं. परिणामी कलाविश्वात प्रभासप्रती असणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या. 

काही दिवसांपूर्वीच हा 'बाहुबली' फेम अभिनेता 'साहो' या मल्टीस्टारर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने प्रथमच अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरीही प्रेक्षकांनी मात्र साहे उचलून धरला. परिणामी या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या कमाईचे आकडे आतापर्यंत १६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. 

चित्रपटाच्या वाट्याला आलेलं यश पाहता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता प्रभासने त्याच्या मानधनाच्या आकड्यात वाढ केल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला चित्रपट वर्तुळात प्रभास हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत प्रभास बराच पुढे आहे, ज्यामुळे त्याला देण्यात आलेला मानधनाचा आकडाही तितकाच मोठा असल्याचं कळत आहे. हा आकडा अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्याच आला आहे, हेसुद्धा तितकंच खरं. एकिकडे चित्रपटाच्या कमाईचे आकडे उंचावणं सुरुच असल्यामुळे सहाजिकच त्याचं मानधनही जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. 

'साहो'च्या निमित्ताने प्रभासच्या करिअरमध्ये एक असं वळण आलं आहे जेथे चित्रपटाच्या यशाप्रमाणेच त्याला मिळणारा नफाही यापूर्वीपेक्षा जास्त आहे. तेव्हा आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजे या अभिमनेत्याला मिळालेल्या मानधनाचा आकडा जाणून घेण्याविषयी.