नीरज चोप्राचं कौतुक करणं बिग बींना पडलं महागात

अमिताभ बच्चन यांनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे कौतुक करणारे एक ट्विट केले होते.

Updated: Aug 11, 2021, 12:30 PM IST
 नीरज चोप्राचं कौतुक करणं बिग बींना पडलं महागात title=

मुंबई : नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे.  नीरजने आपल्या पहिल्या थ्रोमध्ये 87.03 मीटर दूर एक भाला फेकला होता.
आता संपूर्ण देशभरात भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात येत आहे. यासह, बॉलिवूड कलाकार देखील नीरजच्या या  दमदार विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत. 

पण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नीरज चोप्राला त्याच्या विजयासाठी अभिनंदन करणे चांगलच महागात पडलं आहे.

वास्तविक, अमिताभ बच्चन यांनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे कौतुक करणारे एक ट्विट केले होते, ज्यावर त्यांना ट्रोल केले जात  आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्यंगचित्र व्हिडिओ शेअर करून भारताच्या ऑलिम्पिक संघाचे कौतुक केले. हा व्हिडिओ नीरज कुमारची  कामगिरी दाखवतो. त्यांनी नीरज चोप्राच्या कार्टून व्हिडिओच्या ट्विटमध्ये लिहिले, 'एका छातीने 103 कोटी छाती रुंद केल्या आणि भारतीय ऑलिम्पिक संघाने  देशाचा झेंडा जगभरात उंचावला!'

वास्तविक, या ट्विटमध्ये अमिताभ यांनी भारताची लोकसंख्या 130 कोटीऐवजी 103 कोटी लिहिली. यावर लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. एका  वापरकर्त्याने लिहिले, '103 कोटी ?? कोणत्या विद्यापीठाला हे ज्ञान प्राप्त झाले आहे, अंधश्रद्धेत उरलेल्या 27 कोटी लोकांना नायजेरियात पाठवण्यात आले आहे.