'रामायण'नंतर 'या' जुन्या मालिका छोट्या पडद्यावर पुन्हा होणार दाखल

कोरोना महामारीमुळे बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्रीचं देखील मोठं नुकसान झालं. 

Updated: Apr 8, 2021, 02:52 PM IST
'रामायण'नंतर 'या' जुन्या मालिका छोट्या पडद्यावर पुन्हा होणार दाखल  title=

मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. बॉलिवूड, टीव्ही इंडस्ट्रीचं देखील मोठं नुकसान झालं. कोरोनाचा वाढता कहर पाहाता चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. परिणामी जुन्या मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर दाखल झाल्या. रामायण-महाभारत मालिका पुन्हा चर्चेत आल्या. जुन्या मालिकांमुळे टीआरपीनं देखील रेकोर्ड केलं. आताची परिस्थिती पाहाता जुन्या मालिका पुन्हा जुन्या छोट्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर जाणून घेवू कोणत्या मालिका पुन्हा भेटीस येवू शकतात.

'तारा'

झी टीव्हीवरील मालिका 'तारा' तीन महिलांच्या आयुष्यावर आधारित मालिका आहे. यामध्ये महिलांचं खडतर प्रवास, अपेक्षा इत्यादी गोष्टीच्या भोवती फिरते. 

'देख भाई देख'

'देख भाई देख' एक फॅमिली ड्रामा आहे.  आज देखील 'देख भाई देख' मालिका चर्चेत असते. 

'चंद्रकांता'

'चंद्रकांता' ही मालिका प्रेमकथे भोवती फिरताना दिसते. मालिकेतील घडामोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

'ब्योमकेश बक्शी'

'ब्योमकेश बक्शी' इंडियन बंगाली फिक्शन डिटेक्टिव शो आहे. 

'बनेगी अपनी बात '

'बनेगी अपनी बात 'मालिकेत कॅलेजचे दिवस, पहिलं प्रेम, प्रेम विरह या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकालाचं स्वतःचे कॉलेजचे दिवस आठवतील. 

'तू तू मैं मैं'

सासू आणि सूनेच्या भाडणांसाठी प्रसिद्ध असलेली मालिका म्हणजे 'तू तू मैं मैं'. मालिकेत दिवंगत अभिनेत्या रिमा लागू, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर मुख्य भुमिकेत होते. 

'मालगुडी डेस'

'मालगुडी डेस' 90च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध मालिका होती. 

'श्रीमान श्रीमती'

तेव्हा  मालिकेतील विनोदांनी प्रेक्षकांचं  भरभरून मनोरंजन केलं होतं.

'चाणक्य'