Vicky Kaushal लवकरच करणार साखरपुडा !

विकी कौशल सध्या त्याच्या चित्रपटापासून ते रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे.

Updated: Oct 17, 2021, 12:56 PM IST
Vicky Kaushal लवकरच करणार साखरपुडा !

मुंबई : विकी कौशल सध्या त्याच्या चित्रपटापासून ते रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून तो कतरिना कैफला डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. जरी दोन्ही कलाकारांनी अद्याप यावर उघडपणे काहीही सांगितले नाही. पण अशा अफवा पसरल्या होत्या की, विकीने कतरिनाशी लग्न केले आहे. नंतर कतरिनाच्या टीमने हे वृत्त फेटाळले. आता विकी त्याच्या 'सरदार उधम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या नियोजनाबद्दलही बोलले.

विकीने केवळ या अफवा असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला की जेव्हा वेळ येईल तेव्हा तो साखरपुडा करेल. एका मुलाखतीत विकी म्हणतो की 'अशा बातम्या तुमच्या काही मित्रांनी पसरवल्या आहेत. मी पण योग्य वेळ आल्यावर लवकरच लग्न करेन. त्याची पण वेळ येईल.

विकी आणि कतरिना अनेक प्रसंगी एकत्र 

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यातील अफेअरच्या बातमीला पहिल्यांदा उधाण आलं ते जेव्हा दोघे अंबानींच्या होळी पार्टीत एकत्र एन्जॉय करताना दिसले. त्यानंतर, कधी विकी कतरिनाच्या घरी जाताना दिसला तर कधी दोघेही काही कार्यक्रमात एकत्र दिसले. कतरिना नुकतीच विकी कौशलच्या 'सरदार उधम' सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली होती.